काल महायुतीच्या बैठकीला उपस्थित, आज एकनाथ शिंदेंच्या भेट, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात काय

सातारा : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहे. जसंजसं मतदानाची तारीख जवळ येईल तसंतसं महायुतीला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषद उमेदवारीवरुन नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार उपस्थित असल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आम्ही सोलापूर विधानपरिषद निवडणूकित भाजपसोबत आहोत. आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आणि टोकाची कटुता येऊ नये म्हणून मी महायुतीला पाठिंबा दिला आहे.  मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही ही भूमिका घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना तो शो झाला आहे असं सांगत या प्रश्नाला बगल दिली. मतदार संघात निधीची गरज लागते त्यामुळे मी भेट घेतल्याची माहिती जानकर यांनी दिली.

महायुतीच्या कालच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित

सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीची बैठक काल आयोजीत केली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे आणदार उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळ आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित आहेत. केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला आले नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी

Comments are closed.