जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, रेशमा काळेंची माघार
विधान परिषद निवडणूक बातम्या: जळगाव विधान परिषद निवडणुकी मध्ये महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांनी आज मुंबई मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळं आपण आजपासून आपला प्रचार थांबवत असल्याची माहिती रेशमा काळे यांनी दिली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला पाठिंबा
एकनाथ शिंदे यांनी त्यांना महायुतीच्या सोबत राहण्याचा सांगत, महायुतीच्या उमेदवाराला आपली मते द्यायला पाहिजे अशा प्रकारचा सल्ला दिल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे रेशमा काळे या आता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महायुतीचा तिढा संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशा च पालन करत आपण आजपासून आपला प्रचार थांबवत असल्याचं आणि महायुती उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार असल्या बाबतचा व्हिडिओ महायुती मधील बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांनी सोशल मिडिया मध्ये वायरल करत आपली भूमिका स्पष्ट केल्याने,जळगाव विधान परिषद निवडणूक महायुती मधील बंड खोरीचा तिढा सुटल्याच पाहायला मिळत आहे
महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश
जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती मध्ये बंड पुकारून शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. उमेदवारी माघारी दिवशी त्या उमेदवारी माघारी घेतील असे वाटत असताना त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने, महायुती मधे मोठा तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होते, गेल्या चोवीस तासाच्या पासून त्या नॉट रिचेबल असताना, मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव च्या जागेचा तिढा सुटला आहे, या बाबत मंत्री गुलाबराव पाटील उद्या रेशमा काळे यांच्या माघारीची घोषणा करतील,असे सांगितले होते. त्या नंतर आज रेशमा काळे यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता, एकनाथ शिंदे यांनी त्यांना महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशा नंतर रेशमा काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली असून,एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिलेल्या आदेशाच पालन करत आपण आपला प्रचार थांबवत आहे. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचं म्हटल असल्याने, जळगाव विधान परिषद निवडणुकी मधील बंड खोरीचा तिढा आता सुटला असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
Comments are closed.