अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल

सुनेत्रा पवार अर्थ मंत्रालयावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर गेल्या पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेल्या राज्याच्या अर्थ खात्यावरून (Finance Ministry) सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या खात्यासाठी आग्रही आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी भीमाशंकर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्थ खात्याच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sunetra Pawar on Finance Ministry: भीमाशंकरच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भीमाशंकर (Bhimashankar) ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खेडचे आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. भीमाशंकर मंदिर परिसरातील विकासकामांची आणि आराखड्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, “राज्याचं अर्थ खातं कोणाकडे जाणार?” यावर सुनेत्रा पवारांनी “आज आपण विकास आराखड्याबाबत बोलूयात, त्यामुळे त्या संदर्भात बोललं तर बरं राहील,” असं उत्तर दिलं. सुनेत्रा पवारांनी या प्रश्नावर थेट भाष्य करणे टाळल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sunetra Pawar: “एल निनोचा प्रादुर्भाव दूर कर”

सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, भीमाशंकर विकास आराखड्याचा दुसरा टप्पा पूर्ण होतोय. आता डिसेंबरपासून तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल. अजित दादांनी यासाठी मोठा निधी (Funds) दिलेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी (Simhastha Kumbh Mela) लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे,” असे देखील त्यांनी म्हटले. तसेच, “मी काल मुख्यमंत्र्यांसोबत भीमाशंकरला येणार होते, मात्र काही कारणास्तव येऊ शकले नाही, म्हणून आज आले. एल निनोचा (El Nino) प्रादुर्भाव दूर कर, भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी समाधानी ठेव, असे साकडं मी आज भीमाशंकरच्या चरणी घातले आहे,” असेही सुनेत्रा पवारांनी सांगितले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत 9 पैकी 4 जण गैरहजर; मातोश्रीवर कोण-कोण पोहोचले?, संपूर्ण यादी

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Comments are closed.