Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन

Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन

आयुक्त तुकाराम मुंढे यांचे एक पथक बीडच्या परळी शहरात विविध ठिकाणी कारवाईसाठी येणार असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे होणाऱ्या कारवाईची धास्ती घेत शहरातील सर्वच पान टपऱ्या सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच पान टपऱ्यांवर गुटख्यांची आणि वेगवेगळ्या पानांची विक्री होते. अशातच राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कारवाया पाहून पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. परळीत तुकाराम मुंढेंचे पथक आल्याची चर्चा होताच. या सर्व पान टपऱ्या बंद दिसून येतायत. अन्न औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईची अफवा आणि बंद ठेवलेल्या पान टपऱ्या याची जोरदार चर्चा रंगू लागलीय.  गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता आयुक्त मुंढे आणखी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता, उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटलं.

Comments are closed.