आर अश्विन टी20 लीगमध्ये हॅरिस रौफसोबत खेळणार, दोघे 'या' संघाचा भाग

भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन आता पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. तो अमेरिकेच्या टी२० लीग, मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघासोबत करार केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजानेही याच संघासोबत करार केला आहे. याचा अर्थ संघाला विजय मिळवून देण्यात अश्विनला त्याच्यासोबत काम करावे लागणार आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आधीपासूनच सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाचा भाग आहे. आता अश्विनही या संघासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे दोघे एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. रौफ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत त्यांच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे २०२३ पासून खेळत आहे.

२०२३ मध्ये सुरू झालेल्या या लीगचा आता चौथा हंगाम खेळला जाणार आहे. त्यासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने अश्विनला करारबद्ध केले आहे. हा हंगाम येत्या १९ जूनपासून सुरू होणार आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आपला पहिला सामना २० जून रोजी लॉस एंजेलिस नाईट रायडर्सविरुद्ध खेळेल. सध्या यासाठी अश्विनचा सराव जोरात सुरू आहे.

मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. यामध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सची सर्वोत्तम कामगिरी २०२४ मध्ये झाली होती, तेव्हा ते उपविजेते ठरले होते.सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या वेळापत्रकाबद्दल माहिती घेतली तर, २० जून रोजी पहिला सामना खेळल्यानंतर, हा संघ २१ जून आणि २५ जून रोजी टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध सलग दोन सामने खेळणार. २७ जून रोजी त्यांचा सामना सिएटल ऑर्कसशी होईल. तसेच २९ जून रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा सामना वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध आहे.

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा पुन्हा एकदा सामना वॉशिंग्टन फ्रीडमशी होणार आहे, हा सामना ५ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

Comments are closed.