Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
विधान परिषद निवडणूक: विधानपरिषद निवडणूक 2026 च्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. गुरुवारी 18 तारखेला या निवडुकांसाठीची प्रक्रिया पार पाडणार आहे. आज शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर जोरादर टीका टीपण्णी केल्याचं पाहायला मिळालं. भाजप पैशांच्या बळावर निवडणूक लढवतोय, आधी उमेदवार फोडले आता मतदार फोडत असल्याचा आरोप प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी धाराशिवचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी केला. भाजपवर त्यांनी घोडेबाजाराचे आरोप केले आहेत. भाजपचे उमेदवार बसवराज पाटील हे केवळ स्वतःची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका महेश देशमुख यांनी केली.
बसवराज पाटलांनी कधीही कोणाचा विचार केला नाही, त्यांना निवडून दिल्यास उपयोग होणार नाही
बसवराज पाटलांना निवडून दिल्यास जनतेचा कार्यकर्त्यांचा मतदारांचा काही उपयोग होणार नाही, त्यांनी कधीही कोणाचा विचार केला नाही असे महेश देशमुख म्हणाले. धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र झाल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप करत भाजप पैशाच्या बळावर निवडणूक लढवत असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी उमेदवार फोडण्याचे राजकारण झाले आणि आता मतदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे उमेदवार बसवराज पाटील हे केवळ स्वतःची राजकीय उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणेघेणे नसल्याची टीकाही देशमुख यांनी केली. बसवराज पाटील यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते, मतदार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा विचार होणार नाही, त्यांनी यापूर्वीही कोणाचाही विचार केलेला नाही, असा आरोप महेश देशमुख यांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आरोपांमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. आता या आरोपांना भाजपकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद–लातूर–बीड मतदारसंघासाठी भाजपकडून माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, काँग्रेसकडून जि.प. सदस्य महेश देशमुख हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबतच सात अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 4 अपक्ष उमेदवार हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे होते तर, 3 अपक्ष हे महायुतीतील घटक पक्षांचे होते. यामध्ये रिपाइंचे पदाधिकारी तथा अपक्ष उमेदवार मिलिंद महालिंगे यांनी भाजप पदाधिकारी रामचंद्र तिरुखे यांच्यासमवेत येऊन आपला अर्ज मागे घेतला. पाठोपाठ भाजपच्या अर्चना गंगणे यांनीही आपला अपक्ष अर्ज मागे घेतला. यानंतर उर्वरित 5 अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात आपापले अर्ज मागे घेतले. परिणामी, मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता बसवराज पाटील व महेश देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे.
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.