प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, रायगड हादरलं
किरण: रायगड जिल्ह्यातील रोहा (रायगड रोहा) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. निडी गावात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे, त्यानंतर गळफास घेऊन स्वतःला देखील संपवल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शाब्दिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रोहा शहरात एकच खळबळ
मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चारित्र्याच्या संशयावरून नवी मुंबईत पत्नी आणि सासूला संपवलं
नवी मुंबईतील शिरवणे गावात दुहेरी हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीने पत्नी आणि सासूची रविवारी रात्री चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आयुष बाळू निकाळजे असे आरोपीचे नाव असून, त्याने पत्नी अपर्णा निकाळजे आणि सासू मालन गोसावी यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, नेरूळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमके काय घडले आणि या दुहेरी हत्येमागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
रक्तरंजित थरार… नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं, तिघांचाही मृत्यू
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.