उबाठा संपवण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा: जाधव

प्रताप जाधव: शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. त्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब (Operation Tiger UBT Shivsena) झालं आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आम्हाला धमक्या देणार, आम्ही मर्द आहोत आम्हाला धमक्या देण्यापेक्षा त्यांनी आपलं घर संभाळावं. स्वतःचं घर सांभाळता येत नाही म्हणून दुसऱ्याच्या घरावर दगडं फेकण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, अशी टीका जाधव यांनी संजय राऊतांवर केली.

संजय राऊत आज जास्त खूष असतील कारण त्यांच्या मनासारखं होतंय

मूळात जे सुरु आहे हे संजय राऊतांचे पाप आहे. उबाठा संपवण्याचे विडा हा सर्वात जास्त संजय राऊत यांनीच उचलला आहे असी टीका जाधवांनी केली. उलट संजय राऊत आज जास्त खूष असतील कारण त्यांच्या मनासारखे सर्व होत आहे. उबाठातील आमदार खासदार संजय राऊताच्या वक्तव्यांवर अतिशय नाराज आहेत. परवा त्यांनीच वक्तव्य केलं प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षात आपला पक्ष विलीन करावा. आम्हाला असाच समज आहे ते शिवसेना उबाठा लवकरच काँग्रेसमध्ये विलीन करतील. आष्टीकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर दोन घरात दोन मतं प्रवाह असू शकतात यांच्या आधीही अशी अनेक उदाहरणं आहेत. मतभिन्नता असू शकते. खैरेंबाबत सांगायचं जिल्ह्यातील अंबादास दानवेंसोबतचं शितयुद्ध आम्ही जे पाहतो ते जर तिथे एकत्र राहिले तर चांगलं होईल असे जाधव म्हणाले.

उबाठातील असंतोष पाहता नेत्यांना राजकीय भवितव्याची चिंता

उबाठातील असंतोष पाहता नेत्यांना राजकीय भवितव्याची चिंता असते. अशावेळी पक्षाने मागे उभे राहिलं तर असं होत नाही. बाळासाहेब आपल्या पक्षातील नेत्यांचा मागे उभे रहायचे अशी लोकं संभाळली तर अशा गोष्टी होतं नाहीत. बाळासाहेबांच्या काळात असे काही झालं नाही नेतृत्वाचं काम असं आपले पदाधिकारी नेते यांना संभाळणं विश्वासात घेणं , एकनाथ शिंदे ते करतात उद्धव ठाकरेंनी ते करावं असा सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांना सल्ला देण्यासाठी संजय राऊत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली.

Shivsena UBT MP:  काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

Comments are closed.