ऑफिस असो किंवा पार्टी, जीन्स शॉर्ट कुर्ती बेस्ट.





तुम्ही कॉलेज तरुणी असा किंवा वर्कींग वूमन रोज काय पेहराव करावा हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल.अशावेळी तेच तेच ड्रेस किंवा साड्या वापरून तुम्ही कंटाळला असाल तर जीन्स आणि शॉर्ट कुर्तीज हा डेली वेयरसाठी बेस्ट पर्याय आहे. कारण हे आऊटफिट सगळ्याच वयोगटातील महिलांवर शोभून दिसते. यामुळे जीन्स शॉर्ट कुर्तीच कायम ट्रेंडमध्ये आहे.

जीन्स आणि शॉर्ट कुर्तीज ही एथिनिक लूक देणारी फॅशन आहे. तसेच वापरायलाही आरामदायी आहे. बाजारातही कॉटनसह विविध स्टाईलमध्ये या शॉर्ट कुर्ती उपलब्ध आहेत.

यात प्रिंटेड, प्लेन कुर्तीजला महिला व तरुणींची विशेष पसंती आहे. तसेच जर कुर्तीला बेल स्लीव असतील तर तुम्ही अधिकच स्टाईलिस्ट दिसता.

मसाबा कट नेकलाईन असलेली कुर्ती तुमच्या पर्सनेलिटीला मॉडर्न लूक देते. तर फ्लोरल प्रिंट असलेली सिंपल कुर्ती तुम्हाला सगळ्.यात हटके लूक देते.

या कुर्तीजला अधिक स्टाईलिस्ट लूक द्यायचा असेल तर तुम्ही लेस वापरू शकता. जर कुर्तीजचा रंग आणि कॉन्ट्रास्ट रंगाची लेस असेल तर तुमचा लूक उठून दिसतो.

जीन्स आणि कुर्तीजवर फ्लॅट सँडल किंवा चपला शोभून दिसतात. कम्फर्टेबल लूक देतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो.



Comments are closed.