डिजिटल डिटॉक्ससाठी तरूणाईमध्ये वाढतोय अॅनालॉग छंदांचा ट्रेंड
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या प्रभावामुळे जीवन अधिक वेगवान झाले असले तरी अनेक जण आता पुन्हा पारंपरिक छंदांकडे वळताना दिसत आहेत,विशेष करून तरूण मंडळी.. या नव्या ट्रेंडला ॲनालॉग छंद पुनरुज्जीवन असे म्हटले जात आहे. डिजिटल स्क्रीनपासून दूर राहून मनाला शांतता मिळवण्यासाठी पुन्हा या छंदाकडे तरूणाई वळत आहे.
‘अॅनालॉग छंद’ म्हणजे काय?
‘अॅनालॉग छंद’ म्हणजे मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांसारख्या स्क्रीनपासून दूर राहून हाताने जोपासले जाणारे छंद जपणे. हे छंद तणाव कमी करण्यासाठी आणि मनाला शांतता मिळवून देण्यासाठी उत्तम ‘डिजिटल डिटॉक्स’ मानले जातात.
हेही वाचा – वाईट आणि त्रासदायक आठवणी कशा हाताळाव्यात?
रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स – संगीतासाठी स्पॉटिफाय सारखे पर्याय असताना जुन्या रेकॉर्ड, कॅसेट्स खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. जुनी गाणी ऐकण्यासाठी , मूळ आवाज अनुभवण्यासाठी तरूण याचा वापर करत आहेत.
अॅनालॉग फोटोग्राफी – डिजिटल कॅमेऱ्याच्या दुनियेत फिल्म रोल घालणारे जुने कॅमेरे वापरण्याची क्रेझ वाढली आहे.
डायरी लेखन – कीबोर्डवर टाईप करण्याऐवजी हाताने डायरी लिहिणे, कॅलिग्राफी करणे आणि शाईच्या पेनाचा वापर करणे याकडे ‘माइंडफुलनेस’ म्हणून पाहिले जात आहे.
बोर्ड गेम्स आणि वाचन – मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्यक्ष एकत्र बसून चेस, कॅरम सारखे बोर्ड गेम्स खेळण्याचे प्रमाण कॅफे संस्कृतीमध्ये वाढले आहे.
तज्ज्ञांचे मते सततच्या स्क्रीन टाईममुळे मानसिक थकवा जाणवतो. अशावेळी हे अॅनालॉग छंद माणसाला वर्तमानात जगण्यास मदत करतात. हा केवळ एक ट्रेंड नसून मानसिक आरोग्यासाठी उत्तम औषध आहे.
हेही वाचा – का कमी होतोय मुलांचा पेशन्स आणि फोकस?
Comments are closed.