Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण अरविंद सावंत यांनी सांगितली. तर, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तुडवा या शब्दाचा वापर करत पत्रकार परिषद संपवली. त्यामुळं येत्या काळात शिवसेना खासदार फुटीचा संघर्ष तीव्र होण्याची शक्या आहे.उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा शेवट केला.  वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असं अरविंद सावंत म्हणाले.

Comments are closed.