Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, मोहिते पाटलांना विश्वास
Dhairyasheel Mohite Patil : विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्या सोबत होती. अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचा दावा देखील मोहिते पाटलांनी केला. 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल. या दुष्काळमध्ये वसंत बहरेल अस मोहिते पाटील म्हणाले.
कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते
सोलापुरात राष्ट्रवादी शरद पावर गटचे खासदार धैर्यशील मोहिते आणि सोलापूर विधानपरिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोहिते पाटील बोलत होते. कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते. त्यांचा हक्क हिरावून घेऊ म्हणून फक्त आम्ही ऑबजेक्शन घेतलं. मतदानाचा पुरावा म्हणून फोटो काढून नेत्यांना दाखवायचं असा विषय होता असे मोहिते पाटील म्हणाले. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः कॅमेरा असलेला गॉगल दाखवल्याचं पाहायला मिळालं.
मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात, मोहिते पाटलांचा सातपुतेंना टोला
मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात असा टोला मोहिते पाटील यांनी माजी आमदार राम सातपुते यांना लगावला. उत्तम जानकर यांचा विषय हा आमच्या घरातला आहे. आम्ही तो विषय घरात मिटवू असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण मतदार संख्या 616
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण मतदार संख्या जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका व 17 नगरपरिषद/ नगरपंचायत अशा एकूण 19 संस्था असून त्यातील मतदारसंख्या 544 आहे. याशिवाय 49 नामनिर्देशित व 23 अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या 616 इतकी आहे. या निवडणुकीसाठी एकूण 15 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. अखेर 2 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत. जिल्ह्यात एकूण 6 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मध्ये कुर्डूवाडी येथे 80 मतदार, उत्तर सोलापूर येथे 188, दक्षिण सोलापूर येथे 89, पंढरपूर येथे 100, मंगळवेढा येथे 62 व अकलूज येथे 97 मतदारांची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रांवर तहसीलदार हे केंद्राध्यक्ष असतील. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
Comments are closed.