'धमकीची संस्कृती' संपणार!

कोलकाता: पश्चिम बंगालचे राज्यपाल आर.एन. रवि यांनी गुरुवारी विधानसभेला संबोधित केले आहे. राज्यात नव्याने स्थापन भाजप सरकारने मागील शासनकाळात कथित स्वरुपात संरक्षणप्राप्त समाजकंटकांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. याचबरोबर विदेशी नागरिकांची ओळख पटवत त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे रवि यांनी म्हटले आहे.  मे महिन्यात भाजप सत्तेवर आल्यावर नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात अभिभाषण करताना रवि यांनी शुभेंदु अधिकारींच्या सरकारच्या प्राथमिकतांना अधोरेखित केले आहे. धमकीची संस्कृती, भ्रष्टाचाराच्या टोळ्या आणि खंडणीवसुली नेटवर्क समाप्त केले जाणार असल्याचे आश्वासन रवि यांनी सरकारच्या वतीने दिले आहे.

Comments are closed.