ओव्हरटेकची सस्ती अंगाशी, शेलू येथे एर्टिगा कार खड्ड्यात कोसळली; सात प्रवासी बचावले
कल्याण राज्य मार्गावरील शेलू परिसरात – गुरुवारी पहाटेच्या सुमारास एर्टिका कारचा – भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याची – मस्ती चालकाच्या अंगाशी आली असून – वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी – रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात – उलटली. सुदैवाने या अपघातात लहान मुलांसह सात प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मुंबई येथून काही पर्यटक एर्टिका कारमधून कर्जतच्या दिशेने प्रवास करत होते. शेलू परिसरात – आल्यानंतर चालकाने पुढे जाणाऱ्या एका खासगी व्होल्वो बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी – वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्यात उलटली. अपघातग्रस्त कारमध्ये चालकासह – सातजण प्रवास करत होते. त्यामध्ये लहान मुलांचाही – समावेश होता. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही – सर्व प्रवासी सुखरूप बचावले. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी स्थानिक
रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गावकऱ्यांची मदतीसाठी धाव
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू होती. यानंतर हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने येथे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र कारचे मोठे नुकसान झाले होते.
Comments are closed.