IND vs AFG: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल निश्चित; हर्षित राणासहित या खेळाडूचं होणार पुनरागमन
भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट यांनी याबाबत माहिती दिली.
मागील सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांचे संघात परतणे निश्चित मानले जात आहे. टीम इंडियाचा प्रयत्न हा सामना जिंकून मालिका 3-0 ने जिंकण्याचा असेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. विशेषतः पदार्पण करणारा गोलंदाज गुरनूर बरार आणि प्रिंस यादव यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना सहाय्यक प्रशिक्षकांनी सांगितले की, नितीश कुमार रेड्डी आता पूर्णपणे फिट आहे. तसेच, या सामन्यात अर्शदीप सिंग आणि आणखी एका फलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते. तिसऱ्या वनडेसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा (Harshit Rana) संघात समावेश करण्यात आला असून, त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.
तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये टॉप-3 फलंदाजांच्या फळीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील, तर कर्णधार शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तसेच, के.एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याची कोणतीही योजना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.