Omraje Nimbalkar: “वाघ चालला वाघाच्या कळपात!”, ओमराजेंच्या घोषणेआधीच राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात झळकले स्वागताचे बॅनर, चर्चांना उधाण
ओमराज निंबाळकर: राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
या पार्श्वभूमीवर, ओमराजे निंबाळकर यांनी आपली अधिकृत राजकीय भूमिका स्पष्ट करण्यापूर्वीच धाराशिवच्या तुळजापुरात त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे, ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या तुळजापूर मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी हे बॅनर लावले असून त्यावर “वाघ चालला वाघाच्या कळपात!” असा थेट मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Omraje Nimbalkar: आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवे होते: ओमराजे निंबाळकर
दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या जाहीर मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असून ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ओमराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, प्रचंड मेहनत घेतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते,” असे त्यांनी म्हटले आहे.
Omraje Nimbalkar: पक्षांतराचा निर्णय 20 जूननंतर घेणार: ओमराजे निंबाळकर
पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्ट्या विचार केला तर पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, मात्र राजकीयदृष्ट्या विचार केला तर हा निर्णय अगदी बरोबर आहे. माझ्यावर शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. परंतु, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या कोर्टाच्या निकालानंतर, सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी माझा अंतिम निर्णय 20 जूननंतर जाहीर करणार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.