दाढीचे कुरळे केस म्हणताच जैन मुनी निलेशचंद्र संतापले; राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर, म्हणाले…
मुंबई : बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत, निवडणुकांत काय झाले, कशामुळे झाले यावर काम करत होतो, तंगड्या वर करून बसलो नव्हतो. सर्वप्रथम दिलगिरी की वाढदिवसानिमित्त भेटता आले नाही, माझी इच्छा होती, तुमचीही असते, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा (MNS) मेळाव्यात राज ठाकरे मनसैनिका आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी, मुंबईतील पांढऱ्या पट्टीवरुन सुरू असलेल्या जैन आणि मराठी वादाबाबत भाष्य करताना त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टिकेला आता निलेशचंद्र यांनी प्रत्त्युत्तर दिलंय.
महाराजांच्या जिरे टोपावर जैनांचा झेंडा, आपल्या महेशने आंदोलन केले. पण आपल्याला आंदोलनात गुंतवून ठेवले आहे का? काही जैन चांगले काम करत असतील. पण, एक जण कोण आहे भाजपचा, त्याला मुनी ही बोलत नाहीत, त्याला इथे कुरळे केस आहेत. तिथे दाढी-बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आलेत! चला, उलटं झालं की काय झालं? असा टोला राज ठाकरेंनी निलेशचंद्र यांना लगावला. तसेच, आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या, मराठी माणसाचं मनगट पाहिलं का कधी? आम्हाला कुठचेही वाद नको आहेत, भांडण नको आहे. परंतु, वाद उकरून काढणार असाल, तर आम्ही रस्त्यावरती उभे राहू, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर, आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या टीकेला जैन मुनींचं आक्रमक प्रत्युत्तर
दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात थेट वाकयुद्ध पेटले आहे. राज ठाकरेंच्या टीकेला आता जैन मुनींनी उत्तर दिलंय. “हा वाद केवळ व्होट बँकेसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो,” अशा शब्दांत निलेशचंद्र यांनी राज ठाकरेंना सुनावले. स्वतःला कट्टर सनातनी म्हणवून घेताना जैन मुनींनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. “मंत्रालयात बसणारा राम आहे आणि त्याचा हनुमान महाराष्ट्रात आहे. जे लोक भगव्याला हिरवं करण्याचा विचार ठेवतात, त्यांना सरळ करायला हनुमान समर्थ आहे,” असे त्यांनी म्हटले.
वाकड्या केसांवरुन पलटवार
“माझे केस वाकडे की पिकडे, हा माझा प्रश्न असून मी कुणाला उत्तर देण्यास बांधील नाही,” असे म्हणत त्यांनी वैयक्तिक टीकेला उत्तर देणे टाळले. जे मोदी आणि योगींचे विरोधक आहेत, तेच माझे विरोधक आहेत, असे म्हणत दादरमधील कबुतरांचा वाद राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उकरून काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.