श्रीसंतच्या बॉक्सिंग चॅलेंजवर हरभजनची अशी प्रतिक्रिया, जी ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय म्हणाल
Harbhajan Singh Replied Sreesanth on Instagram : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या हंगामातील सर्वात वादग्रस्त आणि कुप्रसिद्ध स्लॅपगेट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच श्रीसंतने भज्जीला (हरभजन सिंग) बॉक्सिंग रिंगमध्ये येऊन दोन हात करण्याचे खुले आव्हान दिले होते. श्रीसंतच्या या विधानानंतर आता हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
श्रीसंतचे हरभजन सिंगला खुले आव्हान
द लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत श्रीसंतने 2008 मधील प्रसिद्ध थप्पडकांडवर भाष्य केले. तो म्हणाला, “भज्जी पा, तुमच्यात जर दम असेल तर माझ्यासोबत बॉक्सिंग रिंगमध्ये या. हे तुम्हाला माझे ओपन चॅलेंज आहे, तेही कागदावर सही करून. जर तुम्हाला थप्पडकांडाचा इतकाच त्रास होत असेल, तर या रिंगमध्ये. तुमच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल तर मी तुमची वाट पाहत आहे.”
हरभजन सिंगचे इन्स्टाग्रामवरून उत्तर
श्रीसंतच्या या आव्हानानंतर हरभजन सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने थेट श्रीसंतचे नाव घेतले नसले, तरी युजर्सच्या मते हे उत्तर श्रीसंतसाठीच आहे. व्हिडिओमध्ये हरभजन सिंग म्हणतो की, “कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, जे लोक बकवास बोलतात त्यांना बोलू द्या… कारण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात.” विशेष म्हणजे या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे प्रसिद्ध गाणे 295 वाजताना ऐकू येत आहे, ज्यामुळे भज्जीने श्रीसंतला चांगलाच टोला लगावल्याची चर्चा आहे.
थप्पडकांडनंतर आता जाहिरात कांडमुळे वाद पेटला
2008 च्या आयपीएल (IPL) दरम्यान हरभजनने श्रीसंतला मैदानात कानाखाली मारली होती. अनेक वर्षे त्यांच्यात अबोला होता, पण नंतर परिस्थिती सुधारली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला एका जाहिरातीमुळे (Advertisement) हा वाद पुन्हा सुरू झाला. जाहिरात काय होती? हरभजन सिंगने एका इलेक्ट्रॉनिक ब्रँडची जाहिरात केली होती, ज्यामध्ये तो शिक्षकाच्या भूमिकेत होता. तो जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मारून सुरू करण्याच्या सवयीवर विनोद करत म्हणतो, “नीट थप्पड मारा, सगळं ठीक होतं.”
श्रीसंतने खुलासा केला होता की, हरभजनने ही जाहिरात त्याला सोशल मीडियावर शेअर करायला सांगितली होती. मात्र, श्रीसंतने याला साफ नकार दिला. जुन्या जखमांवरून जाहिरात केल्यामुळे श्रीसंत हरभजनवर प्रचंड संतापला असून, यामुळेच त्यांच्यातील संबंध पुन्हा एकदा पूर्णपणे बिघडले आहेत.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.