IND Vs AFG – रोहित-यशस्वीची तडाखेबंद फलंदाजी; प्रसिद्धचा भेदक मारा, हिंदुस्थानने अफगाणिस्तानला लोळवलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे याही सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि सामना 9 गडी राखून जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने आपल्या खिशात घातला. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे आणि प्रसिद्ध कृष्णाच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना एकहाती जिंकला.

सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव 44.2 षटकांत अवघ्या 218 धावांवर आटोपला. प्रसिद्ध कृष्णाने दमदार कामगिरी करत 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात 28.4 षटकांतच हे लक्ष्य गाठले आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वालने (110) नाबाद शतकी खेळी केली, तर कर्णधार रोहित शर्माने (79) अर्धशतक झळकावून त्याला उत्तम साथ दिली.

Comments are closed.