यशस्वी जायस्वालमुळे रोहित शर्माचे वाढले टेंशन? कॅप्टन गिलचे 'हिटमॅनच्या भविष्याबद्दल' चक्रावून टाकणारे उत्तर!
शनिवारी (२० जून) चेन्नईमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा वनडे सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जायस्वालने शतकी खेळी केली. तो या सामन्यात ११० धावा करत नाबाद राहिला, मात्र त्याच्या या खेळीनंतर रोहित शर्माचे भविष्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिलनेही रोहितच्या परिस्थितीबाबत स्पष्ट वक्तव्य केले नाही.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित अपयशी ठरला, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने ४८ धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात ७९ धावांची खेळी करत तो अजुनही फॉर्ममध्ये आहे, हे त्याने सिद्ध केले. या मालिकेत ईशान किशननेही शतकी खेळी केली आणि डोकेदुखीमध्ये भर टाकली. आता ते कसे काय, हे जाणून घेऊ
वनडे सामन्यांमध्ये गिल सहसा रोहितसोबत सलामीला येतो, मात्र या मालिकेत विराट कोहली अनुपस्थित राहिल्याने गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. जर विराट फिटनेस टेस्टमध्ये पास होत इंग्लंड दौऱ्यासाठी संघात परतला तर पुन्हा एकदा गिलला सलामीला यावे लागण्याची शक्यता आहे, मात्र त्याच्यासोबत रोहित असेल की यशस्वी? ही एक चर्चा सुरू झाली आहे.
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गिल म्हणाला, “सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. मला वाटते की (इंग्लंड दौऱ्यासाठीचा) संघ उद्या किंवा पुढील काही दिवसांत जाहीर केला जाईल. त्यानंतर आम्ही आमच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनबद्दल विचार करू. आम्ही पाहू की प्रत्येकाची फिटनेस कशी आहे. जर सर्वजण फिट असतील, तर संघात कोण असेल हे आम्ही पाहू. आम्ही सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा प्रयत्न करू.”
यावेळी गिलने यशस्वीचे कौतुकही केले. तो म्हणाला, “खरं सांगायचे तर, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. सर्व खेळाडू उपलब्ध असताना त्याला वगळले जाणे हे दुर्दैवी आहे. विराट या मालिकेत नाही, त्यामुळे त्याला संधी मिळाली. आशा आहे की, तो मिळालेल्या संधीचे सोने करत राहिल.”
तिसऱ्या वनडेमध्ये यशस्वीने भारतीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन शतके करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. धवनने ही कामगिरी ७ डावांमध्ये केली होती, तर यशस्वीने ६ डावांमध्येच दुसरे वनडे शतक ठोकले. केदार जाधव ९ डाव खेळत तिसऱ्या स्थानावर आहे.
Comments are closed.