ओमराजे मला मुलासारखे, ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार, सावंतांची कबुली
तानाजी सावंत : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज अखेर त्यांची भूमिका जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या (Ekanth Shinde) नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी केली आहे. आज त्यांनी दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, या ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार होते. ओमराजेंनी घोषणा करतात तानाजी सावंत यांनी याबाबत कबुली दिली आहे.
माझा शब्द त्यांनी पडू दिला नाही याचं समाधान
ऑपरेशन टायगरला ओमराजेंकडून पूर्ण विराम मिळाला याचं समाधान असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. ओमराजे निंबाळकर मला मुलासारखे आहेत, आमचं नातं तसं आहे. माझा शब्द त्यांनी पडू दिला नाही याचं समाधान असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर संपूर्ण मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी प्रवेश केल्याचे सावंत म्हणाले. सात वर्ष विरोधी पक्षात असल्याचा बॅकलॉग भरुन काढण्याचा शब्द एकनाथ शिंदेनी दिला असल्याचे तानाजी सावंत म्हणाले.
सत्तेचा वापर सामान्य माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी करणार : ओमराजे निंबाळकर
दरम्यान,सत्तेचा वापर सामान्य लोकांसाठी करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. कुठलाही पक्ष असला तरी विरोध कायम असेल, सत्तेची ताकद घेऊन काम करू, अनेक कामं आज होत नाहीत. आज सगळ्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम करेन, सामान्य माणूस मला ओळखतो. पैसे, किंवा पदासाठी मी जात नाही. माझ्याकडे सामान्य माणसे आहेत, मोठी कोणी नाहीत. मी शब्द देतो, सत्तेचा वापर सामान्य माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी काम करेल. माझे काम काहीच स्वतःचे नाही, सत्तेचा उपयोग कसा केला जातो हेही दाखवून देऊ, मी बोलण्यापेक्षा मी घेतलेला निर्णय कामातून दाखवेन, असेही ओमराजेंनी म्हटले. आता महायुतीमधील शिवसेना पक्षात आलो असलो तरीही नीच प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध कायम राहिल, असे म्हणत राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आपला राजकीय विरोध कायम राहिल, असेही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पवनराजे निंबाळकर खटल्यात राजकीय वैमनस्य होते हे कोर्टाने मान्य केले जाते, पण निकाल आला तो दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
त्यांच्या DNA मध्ये गडबड, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा उभा राहा, फुलटेल्या खासदारांवर राऊतांचा प्रहार
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.