ईडीने वीणा विजयन यांना समन्स बजावले आहे

तिरुअनंतपुरम :

केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कन्या वीणा यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. ईडीने सीएमआरएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वीणा यांना पुन्हा समन्स जारी करत 29 जून रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ईडीने 17 जून रोजी वीणा यांची 9 तासांहून अधिक वेळेपर्यंत चौकशी केली होती. आता ईडीने चौकशीदरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर वीणा यांना पुन्हा पाचारण केले आहे. या प्रकरणावरून केरळचे राजकारणही तापले असून विरोधी पक्ष सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. खाण कंपनी कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडकडून (सीएमआरएल) वीणा यांची आयटी कंपनी एक्सालॉजिक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला 2.78 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम कंपनीला कुठल्याही सेवेच्या बदल्यात देण्यात आली नव्हती. रक्कम मिळाल्यावरही एक्सालॉजिकने वास्तविक सेवा प्रदान केली नव्हती असा आरोप आहे. याच आधारावर ईडी या पूर्ण आर्थिक व्यवहाराला संशयास्पद मानून मनी लॉन्ड्रिंगच्या पैलूचा तपास करत आहे.

Comments are closed.