FIFA World Cup 2026 – तोंड झाकलं, मैदान सोडलं!
फिफा विश्वचषकात नव्या नियमाचा पहिला बळी पराग्वेचा मिगेल अल्मिरॉन ठरला. तुर्कीएविरुद्धच्या सामन्यात मर्ट मुल्डरशी वाद घालताना त्याने तोंड झाकून काही बोलल्याचे दिसले. रेफ्री इव्हान बार्टन यांनी व्हिडीओ पुनरावलोकनानंतर नव्या नियमाअंतर्गत त्याला थेट लाल कार्ड दाखवले. वर्ल्ड कपमध्ये तोंड झाकल्यामुळे लाल कार्ड मिळवणारा अल्मिरॉन हा पहिलाच खेळाडू ठरला.
Comments are closed.