6 पैकी दोघांनी जाहीर केलं, 4 खासदार गेले कुठे?; ऑपरेशन टायगरची अजूनही अधिकृत घोषणा का नाही?, मह
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर: ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले त्याला आता 6 दिवस उलटून गेलेत. ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) पूर्ण यशस्वी झाले, असे वारंवार शिंदेंच्या शिवसेनेकडे सांगण्यात आले. आज-उद्या करत लोकसभा अध्यक्ष स्वतःच वेगळा गट स्थापन झाल्याची घोषणा रविवारी करतील असेही सांगितले. मात्र रविवार उलटून गेला तरीही एकही पुरावा अजून जाहीर करण्यात आला नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रमाणपत्र आणि फोटो आहेत, शिवसेनेकडे व्हिडीओ आहेत असेही सांगण्यात आले. मात्र अजूनही यापैकी एकही गोष्ट का जाहीर करण्यात येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. सहा पैकी 2 खासदारांनी रविवारी स्वतःच पुढे आपण एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचे जाहीर केले मात्र इतर 4 खासदार कधी मुंबईत येणार? मतदार संघात कधी जाणार? आपली भूमिका कधी स्पष्ट करणार याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. (Shivsena Opration Tiger)
लोकसभा अध्यक्षांकडे खासदारांचे दोन व्हिडीओ- (Shivsena Opration Tiger)
लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेनेकडे पाच खासदारांचा एक आणि एका खासदाराचा एक असे दोन व्हिडीओ आहेत. मात्र ते देखील जाहीर केले जात नसल्याने नेमकी अडचण कोणती हा मोठा पेच आहे. सोमवारी म्हणजे आज तरी शिवसेनेकडून पुरावे सादर केले जाणार का? लोकसभा अध्यक्ष वेगळा गट स्थापन झाल्याचे जाहीर करणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. (Shivsena Opration Tiger)
ओमराजे निंबाळकरांनी जाहीर केला निर्णय- (Omraje Nimbalkar On Uddhav Thackeray)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकासकामांसाठी घेतल्याचे सांगितले. यावेळी ओमराजे निंबाळकरांनी पवनसिंह निंबाळकर प्रकरणाचाही उल्लेख केला. निकाल विरोधात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा करून दिल्याचा दावाही ओमराजे निंबाळकरांनी केला.
ठाकरेंचे कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? (Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
संबंधित बातमी:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.