उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, ना
नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी (दि. 22) जाहीर होत आहे. मात्र, या निकालाच्या काही तास आधीच निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याचे मानले जात असलेले अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अचानक मतमोजणी केंद्रावर हजेरी लावत मोठा ‘घुमजाव’ केला आहे. “मी निवडणुकीतून माघार घेतली नव्हती आणि मला विजयाचा 100 टक्के विश्वास आहे,” असा दावा गीते यांनी केला आहे. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Gokul Gite: मतदारांचा उद्रेक पाहिला, मीच जिंकणार : गोकुळ गीते
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी गोकुळ गीते अचानक दाखल झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “या मतदारसंघातील मतदारांचा 31 मे पासून मी उद्रेक बघितलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, या मतदारसंघातील मतदारांनी मला शंभर टक्के मतदान केलेले आहे. त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल, अशी मला अपेक्षा आहे. मी माझा प्रचार थांबवल्याचे म्हटले होते, मी कुठलाही माझा व्यक्तिगत प्रचार केला नव्हता. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता आता निवडणूक खूप पुढे गेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जी प्रचार यंत्रणा राबवली, त्यामुळे मला विश्वास आहे की, मी निवडून येईल. मी माघार घेतलेली नाही. तुम्ही तो शब्द वापरू नका, मी निवडून येणार,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: छुप्या मतदानाचा संशय खरा ठरणार?
महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी यांना पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीची शंका आणि संशय होता, तेच आज घडताना पाहायला मिळत आहे. गोकुळ गीते यांची मतमोजणी केंद्रावर झालेली एन्ट्री ही सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. ग्रामीण भागातील मते तसेच शहरातील देखील काही महायुतीची मते आपल्या पारड्यात पडतील, असा विश्वास गीते यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
Narendra Darade: काय म्हणाले नरेंद्र दराडे?
दुसरीकडे, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनीही आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच वेळी येवला येथे मते फुटली असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता काही बोलत नाही, मात्र निकालानंतर सर्व काही स्पष्ट करेल,” असा इशारा दराडे यांनी दिला आहे.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: मतमोजणीची सद्यस्थिती
या निवडणुकीसाठी 18 जून रोजी तब्बल 99.84 टक्के मतदान झाले होते. एकूण 619 मतदारांपैकी 618 जणांनी मतदानाचा हक्क (Right to Vote) बजावला होता. विजयासाठी 310 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्याची शक्यता आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: गोकुळ गीतेंचा आक्षेप, मतमोजणीला विलंब
नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवल्याने मतमोजणी प्रक्रिया थांबली आहे. गीतेंच्या आक्षेपावर सध्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू असून त्यानंतरच मतमोजणीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, गोकुळ गीते यांनी नेमका कोणत्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद संख्याबळ
नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण पक्षनिहाय संख्याबळ खालीलप्रमाणे आहे.
भाजप – 188
शिंदेंची शिवसेना (Shiv Sena – Shinde) – 171
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Ajit Pawar) – 107
ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena – UBT) – 45
इस्लाम पक्ष – 35
एमआयएम – २१
काँग्रेस (Congress) – 13
अपक्ष आणि इतर (Independents & Others) – 39
एकूण 623 मतदारांपैकी 4 जागा रिक्त असल्याने 619 मतदार पात्र होते, त्यापैकी 618 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले आहे.
आणखी वाचा
विजय थलापथी: तामिळनाडू काँग्रेसने अभिनेता विजयसोबत हातमिळवणी केली
Comments are closed.