राम मंदिर दान घोटाळा पै पै चा हिसाहेब… राम मंदिर देणगी घोटाळ्याला पर्याय म्हणून तिरुपती मंदिर पॅटर्न का सुचवला जात आहे?

गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी गैरव्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर आवाज उठवला जात असताना आता  असे घोटाळे टाळण्यासाठी तिरुमला येथील तिरुपती मंदिराचा पॅटर्न  सुचवला जात आहे. चला जाणून घेऊया आदर्श मानला जाणार  तिरुपती मंदिर व्यवस्थापनाचा पॅटर्न नेमका कसा आहे?

राम मंदिर देणगीचा घोटाळा

अयोध्येतील राम मंदिर सध्या देशव्यापी चर्चेचा विषय बनले आहे. मंदिरात दान केलेल्या रोख रकमेची आणि दागिन्यांची चोरी हे प्रकरण चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. मंदिराचे बांधकाम आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या राम मंदिर ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, देणग्या मोजण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणातील दुवे जोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांसंदर्भातील वाद मिटवण्यासाठी, श्री राम जन्मभूमी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी तिरुमला येथील तिरुपती मंदिराच्या धर्तीवर राम मंदिरासाठी देणगी प्रणाली प्रस्तावित केली आहे.

तिरुपती मंदिराचे मॉडेल स्वीकारा

राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मॉडेलचा अवलंब करण्याची सूचना केली आहे. तिरुपती मॉडेलनुसार, राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी एका स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) नियुक्ती करावी, असे त्यांनी सुचवले.

एका मुलाखतीत मिश्रा यांनी सांगितले की, तिरुपतीमध्ये आयुक्त दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतो, जो आयएएस स्तरावरील प्रशासकीय अधिकारी असतो. हा सीईओ साधारणपणे पाच ते सात वर्षे सर्व कामकाजावर देखरेख ठेवतो. त्यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी नियुक्त होणाऱ्या सीईओला अयोध्या आणि राज्याची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उत्तर प्रदेशात काम करण्याचा अनुभव असावा.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणानंतर ज्या तिरुपती मंदिराचा पॅटर्न राबवण्याची चर्चा सुरु आहे तिथली व्यवस्था नेमकी कशी चालते चला पाहूया.

Comments are closed.