नांदेडमध्ये काल गांXXXX, डरपोकगिरी पाहिली, राऊतांकडून पुन्हा अपशब्दाचा वापर, तीन गद्दारांसोबत 8

संजय राऊत: शिवसेना ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांचा अखेर 22 जून रोजी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी “आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो” असे म्हणत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा केला. इतकेच नव्हे, तर हे सहाही खासदार आगामी निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील आणि विजयीही होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यामागचे कारण सांगताना संबंधित खासदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने कामे रखडत असल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या या खासदारांच्या मतदारसंघांसाठी निधी मंजूर झाल्यानंतरही त्यातील मोठा हिस्सा खर्चच करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निधीअभावी विकासकामे रखडल्याचा दावा कितपत खरा, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, जसे झाकलेले पुतळे उघडतात, तसे सहा खासदार शिंदेंनी उघडून दाखवले. ते म्हणाले, आमच्या पक्षात मान सन्मान ठेवू. मग आमच्या पक्षात मान सन्मान नव्हता का? निधीसाठी गेले म्हणतात. मग आकडे समोर आले आहेत, जे निधी आले तेच त्यांनी वापरले नाही. मग कोणत्या निधीसाठी तुम्ही गेलात? एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. 200 कोटी, 300 कोटीची कामे मिळणार आहेत. निधी म्हणून त्यातले 25 टक्के त्यांच्या घरात जाणार आहेत. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मानसन्मान आहे. या राज्याची आणि त्या मतदार संघातील जनता खुळी नाही, अशी टीका त्यांनी केली.

Sanjay Raut: तुम्ही हे गद्दार सोबत घेतलेत, त्यांना व्यवस्थित सांभाळा

काल मिंधे गटातला एक पोपट म्हणत होता की, हे काही पाळणाघर आहे का? बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचे काम काला मिंधे गटाने केले. बाळासाहेब ठाकरे यांनी पाळणाघरे काढली, वृद्धाश्रमे काढली, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. आता तुम्ही हे गद्दार सोबत घेतले आहेत, त्यांना व्यवस्थित सांभाळा. पण, मतदार संघातील जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढील कारवाई सुरू होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut:  जणू आम्ही काही इराणप्रमाणे वरतून बॉम्ब टाकणार आहोत

संजय राऊत पुढे म्हणाले की, काल नांदेडला आमच्या शिवसैनिकाकडून एका गद्दाराला अडवायचा प्रयत्न झाला. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला त्यांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या. दोन किंवा तीन गद्दार होते आणि साडेआठशे पोलीस होते. अख्खं विमानतळ पोलिसांनी घेरलं होतं. जणू आम्ही काही इराणप्रमाणे वरतून बॉम्ब टाकणार आहोत. एवढी डरपोकगिरी आहे, तुम्ही आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी काय सांगताय? तुम्ही सगळेजण किती खोटं बोलत आहात, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

आणखी वाचा

Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात

Comments are closed.