Ratnagiri News – दापोलीत दमदार पावसाची सुरुवात ; रस्त्यातील खड्डे पाण्याची झाली डबकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोलीत दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडेल यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेले चांगलेच सुखावले आहेत.

दापोली तालुक्यात सर्वच गावांमध्ये पावसाने आपली बरसात सुरू केली असल्याने कोरडी झालेली जमीन पावसाच्या पाण्याने पुर्णपणे भिजून गेली आहे. सगळीकडील रस्त्यावर छत्री घेतलेले लोक दिसून येत होते. त्यातच ठिक ठिकाणच्या रस्त्यावर पडलेलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पावसाच्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यातील माती मिश्रित गढूळ पाणी हे वाहनांच्या येण्या जाण्याने रस्त्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या धानाला आलेल्या रुजव्याला पडलेल्या पावसामुळे चांगलीच उभारी मिळाली आहे. तर पाणी टंचाईसदृष्य गावात नाही म्हटले तरी थोडाफार दिलासा मिळाला आहे. एकणुच शेतकरी राजा पावसाच्या बरसण्याने चांगलाच सुखावून गेला आहे. दरम्यान दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विदया विभागाच्या हवामान केंद्रात सकाळच्या सत्रात ६३. २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने बरसण्यास सुरुवात केली आणि गिम्हवणेत बत्ती झाली गूल

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कुठे एकदाचा पाऊस सुरू झाला त्यामुळे पाणी होणार याने सर्वच आनंदीत असतानाच दूसरीकडे मात्र गिम्हवणेत बत्तीगूल झाली. एकीकडे रस्त्यावर पाणी झाल्याने बाहेर पडू नये असे वाटत असतानाच दुसरीकडे घरी लाईट नसल्याने एकुणच विरंगुळ्याची मोठीच अडचण झाली.

दापोलीत विदयुत महावितरण कंपनीचा दिवसेंदिवस भोंगळ कारभार वाढला असून जरा जरी वारा सुटला वा पाऊस कोसळला तरी विज पुरवठा खंडित होतो. तसेच गिम्हवणेत झाले. दापोली शहरालगतच लागून असलेल्या गिम्हवणेत इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाच्या बरसातीची दमदार हजेरी लागली तर दुसरीकडे मात्र विजच गायब झाल्याने रात्रभर कुढत काढावे लागले. कुठे विदयुत वाहीनीच्यांवर झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या तर कुठे विद्युत वाहिन्याच तुटून खाली पडल्या. त्यामुळे सोमवारी खंडीत झालेला विजपुरवठा दुसऱ्या दिवशी मंगळवारची सायंकाळ झाली तरी खंडीत झालेला विजपुरवठा पूर्वत करता आला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हा एकुणच सर्वच व्यवसायीकांच्या व्यवसासायांना बसला त्यामुळे व्यवसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. पाणी पुरवठा करणाऱ्या योजना विजेच्या खंडीत प्रकाराने ठप्प पडल्या.

Comments are closed.