अलिबागच्या विद्यार्थ्याला मुंबईचे परीक्षा केंद्र; ‘आयडॉल’चा अनागोंदी कारभार, युवासेनेने उठवला आवाज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई विद्यापीठ दुरस्थ शिक्षण विभाग (आयडॉल) येथील एम. ए. (पब्लिक रिलेशन) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अलिबागच्या विद्यार्थ्याला मुंबईचे परीक्षा केंद्र देण्यात आले. ‘आयडॉल’च्या या अनागोंदी कारभाराविरोधात युवासेनेने आवाज उठवला. त्यानंतर अलिबागच्या विद्यार्थ्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे लांबच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मागणी केलेला परीक्षा केंद्र देण्यात आली.

अलिबागच्या विद्यार्थ्याची प्रथम सत्र परीक्षा अलिबागच्या जनता शिक्षण मंडळ यांच्या महाविद्यालयात घेण्यात आली. परंतु दुसरी सत्र परीक्षा 25 जून ते 2 जुलै या कालावधीत होणार असून त्याला कलिना पॅम्पस, मुंबई विद्यापीठ हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. अलिबागवरून दररोज परीक्षेसाठी कलिना पॅम्पस येथे येणे त्याला शक्य नसून आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. याविरोधात युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन देत विद्यार्थ्याच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा पहिल्या सत्र परीक्षा पेंद्रावर घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

युवासेनेच्या मागणीला यश

आयडॉलमधील अलिबाग येथील विद्यार्थ्याला कलिना कॅम्पस परीक्षा केंद्र देण्यात आल्यावर दूरध्वनीद्वारे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा कलिना पॅम्पस येथेच घेण्यात येतात. ही बाब युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या निदर्शनास  आणून दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे लांब पल्ल्याच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मागणी केलेले परीक्षा केंद्र देण्यात आले.

Comments are closed.