केतनला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची Inside Story

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, पुणे: पुण्यातल्या (Pune Crime) एका प्रसिद्ध बिझनेसमनचा मुलगा, उच्चशिक्षित काही दिवसांपूतच लग्नाच्या बोहोल्यावर चढणार असतो, लग्नाची जय्यत तयारी सुरू असते, अगदी जयपूरमध्ये (Jaipur) लग्नसोहळ्यासाठी 16 लाख रुपयांचा पॅलेससुद्धा बुक केलेला. पण, त्यापूर्वी होणारे नवरा-बायको लोणावळ्यात लोहगडावर ट्रेकिंगला (Trekking At Lohagad) गेले आणि संसाराला लागण्यापूर्वीच नियतीनं चक्र फिरवली आणि लोहगडावरुन (Lohagad, Lonavala) पाय घसरुन दरीत पडून तरुणाचा मृत्यू झाला. सुरुवातीला असंच सर्वांना वाटलेलं, सारेच हळहळ व्यक्त करत होते. पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि साक्षात ब्रम्हदेवानंही अंदाज बांधला नसेल, अशा गोष्टी समोर आल्या. जिच्यासोबत संसाराची स्वप्न रंगवली, तिनंच घात केला आणि तरुणाचा जीव घेतला. पुण्यातल्या तरुणाचा अपघाती मृत्यू नव्हता, तर त्याच्या होणाऱ्या बायकोनंच त्याचा काटा काढलेला.

पुण्यातल्या (Pune News) केतन अग्रवाल मृत्यू (Ketan Agrawal) प्रकरणानं (Ketan Agrawal Death Case) अख्ख्या देशात खळबळ माजवलीय. जिच्यासोबत साखरपुडा झालाय तिच्यासोबत तो पुण्यातील लोहगडावर ट्रेकिंगला जातो, फोटोग्राफी करताना पाय घसरून पडल्यानं त्याचा मृत्यू झालाय, अशी बातमी धडकते, तोंडावर लग्न आलं असताना मुलगा गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, सगळे हळहळ व्यक्त करतात… पण, अपघाती मृत्यू म्हणून तपास करणाऱ्या पोलिसांना एक गोष्ट खटकते आणि त्याचा मागोवा करतानाच एक धक्कादायक सत्य उजेडात येतं. ते म्हणजे , तो पाय घसरून पडलेला नसतो. तर त्याची हत्या करण्यात आलेली असते. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना पुण्यात घडलीय. आणि या हत्येचा घटनेचा पोलिसांनी नेमका कसा छडा लावला? सविस्तर जाणून घेऊयात…

नेमकं घडलं काय? (Ketan Agrawal, Siya Goyal)

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पुण्यातल्या बिझनेसमनचा मुलगा केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालं. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता. यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकरानं केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता, असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानं दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं.

केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया गोयलनं कसा रचला? (पुणे लोणावळा लोहगड किल्ला खून प्रकरण)

ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते. त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येताहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अगरवालची हत्या करण्यात आली आहे. सिया गोयलशी लग्न करुन सुखी संसाराचं स्वप्न केतन अग्रवाल यानं पाहिलेलं. पण तीनच केतनचा केसानं गळा कापला आणि या हत्येत सियाला साथ दिली ती, तिचा प्रियकर चेतन चौधरीनं.

सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आली होती. मात्र, त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियान आणि चेतननं ठरवलं. केतनची ट्रेकिंगची आवड लक्षात घेऊन त्याला लोहगडावर घेऊन जायचं आणि तिथं त्याचा काटा काढायचा, असा कट सिया आणि तिचा प्रियकर चेतननं रचला. केतन आणि सियाचं प्री वेडिंग शूट बालीला करायचं ठरलेलं. 6 जुनच्या विमानाची तिकिटं बुकसुद्धा झालेली. पण त्यापूर्वीच 4 जूनला केतनला लोहगडावर घेऊन जायचं आणि प्रेमातील अडसर दूर करायचे, असं सिया आणि चेतननं ठरवलं होतं. मात्र, केतन अग्रवाल यानं त्यावेळी लोहगडावर येण्यास नकार दिला. आता केतनशी लग्न करायचंच नाही, तर प्री वेडिंगसाठी बालीला का जायचं? मग प्री वेडिंग शूट टाळण्यासाठी सियानं केतनचा पासपोर्ट गायब केला. त्यामुळं मुंबई विमानतळावर पोहचलेल्या केतनला बालीचं प्री वेडिंग शूट रद्द करण्याची वेळ आली.

सियाच्या हट्टाखातर केतन तिच्यासोबत लोहगडावर ट्रेकिंगसाठी आला. फोटोसाठी पोज देताना केतनचा घात करण्यात आला. ही हत्या लपवण्यासाठी केतनचा पाय घसरून तो लोहगडावरून पडला, अशी कहाणी सियानं सांगायला सुरूवात केली. तसंच हत्येच्या दिवशी आपण लोहगडावर होतो, हे उघड होऊ नये, म्हणून सियाचा प्रियकर चेतननं देखील एक शक्कल लढवली होती.

सियाच्या प्रियकरानं लढवलेली शक्कल, पण… (Ketan Agarwal Pune Murder Case)

18 जूनला लोहगडावर फोटोसाठी पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. असा बनाव सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं रचला. यासाठी लोहगडावर येताना चेतननं स्वतःचा फोन न आणता, कामगाराचा फोन सोबत आणला होता. तो लोहगडावर हजर होता, हे समजू नये म्हणून हुडी आणि हेडफोन घालून स्वतःची ओळख लपवली. केतनची हत्या नसून अपघात आहे, हे पटवून देण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं अशी बरीच खबरदारी घेतली. पण सीसीटीव्हीत सिया आणि चेतननं एकमेकांना जे खुनवलं, ते दिसलं आणि त्यांची तिच चूक त्यांच्या धक्कादायक कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्त्वाची ठरली.

केतनच्या मृत्यूनंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिची देहबोली अग्रवाल कुटुंबीयांना खटकलेली. पण, मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या अग्रवाल कुटुंबानं त्याची फारशी दखल घेतली नव्हती. पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या प्रकरणाचा तपास करत आरोपींचं बिंग फोडलं. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला बेड्या ठोकल्यात. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

केतनची हत्या करून आपलं प्रेम यशस्वी करू, असा टोकाचा विचार सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं केलेला. मात्र, आता त्यांना पुढचं आयुष्य तुरूंगाच्या चार भिंतीआड काढावं लागणार आहे. यात काहीही चूक नताना निष्पाप केतनला जीव गमवावा लागला.

पाहा व्हिडीओ : Ketan Agrawal Pune News :केतन अगरवालला संपवण्यासाठी लोहगड का निवडलं? रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ketan Agrawal Death: सिया गोयलच्या बॉयफ्रेंडची भर उन्हातली एक चूक अन् पोलखोल…, पोलिसांनी कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं कोडं?

एबीपी माझाची बातमी LIVE

Comments are closed.