Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Tukaram Mundhe : गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक

राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे. 

Padma Awards : रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कारांचे’ (Padma Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्म’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा (Bhiklya Ladkya Dhinda) यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Comments are closed.