लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटि
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (Ketan Agarwal Death case) (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतनची (Ketan Agarwal Death case) होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी केतनला दरीत ढकलून संपवल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ketan Agarwal Death case) सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, बिबवेवाडी) आणि सियाचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, हा अपघात नसून घात असल्याचं कसं निष्पन्न झालं, सिया आणि तिचा प्रयकर चेतन यांच्यात किती वेळा बोलणं झालं होतं, या सगळ्याची माहिती समोर आली आहे.(Ketan Agarwal Death case)
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. केतनच्या होणाऱ्या पत्नीने, म्हणजेच सिया गोयलने हा निव्वळ एक अपघात असल्याचे भासवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली खरी, मात्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना या संपूर्ण घटनेत संशय जाणवला. त्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जे सत्य समोर आले त्याने पोलिसांनाही चक्रावून सोडले.(Ketan Agarwal Death case)
Ketan Agrawal death : तांत्रिक पुराव्यांनी उघड केले गुपित
पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तेव्हा त्यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांचा उघड पर्दाफाश झाला. तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १८ जून या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संभाषण झाले होते. या ६ महिन्यांत त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांशी संवाद साधला होता. यावरून या दोघांनी किती योजनाबद्ध पद्धतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला होता, हे स्पष्ट होते.
Ketan Agrawal death : घातपाताचे अनेक प्रयत्न आणि संशयास्पद हालचाली
पोलीस तपासात आणि अग्रवाल कुटुंबीयांच्या दाव्यानुसार या हत्येमागील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आधीही सियाने हत्येचा प्रयत्न केला होता. सियाने यापूर्वी केतनला ३ ते ४ वेळा लोहगड किल्ल्यावर नेले होते. १४ जून रोजी जेव्हा दोघे पुन्हा लोहगडावर गेले होते, तेव्हाही सियाने केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे.
केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि तो एक अनुभवी ट्रेकर होता. ज्या ठिकाणाहून तो कोसळल्याचा बनाव रचण्यात आला, ती भौगोलिक स्थिती पाहता केतनसारखा अनुभवी तरुण तिथून स्वतःहून पडणे निव्वळ अशक्य असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याच संशयावरून त्यांनी सखोल तपासाची मागणी केली होती. पोलिसांनी किल्ल्यावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपी चेतन चौधरी हा अत्यंत संशयास्पद पेहरावात आणि चेहरा लपवून केतन आणि सियावर पाळत ठेवत असल्याचे स्पष्ट दिसले. फोन कॉल्सचा हा भक्कम तांत्रिक डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बळावर पोलिसांनी अखेर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मुसक्या आवळल्या असून, या थरारक मर्डर मिस्ट्रीचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Ketan Agrawal death : तिचे इतर पोरांसोबत देखील अश्लील चॅटिंग
त्या पोरीचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, ती त्याच्यासोबत फिरायला उदयपूरला देखील गेली होती, तिचे इतर पोरांसोबत देखील अश्लील चॅटिंग आहेत, हे समजत नाही की तिचे किती पोरांसोबत संबंध आहेत, काय आहेत, काय नाहीत, आता सगळं तपासात निघेल तिने तिच्या प्रियकराला अठरा तारखेला गडावर बोलावलं आणि त्याला सांगितलं आमच्या केतनला धक्का मार, असं मृत केतनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Ketan Agrawal death : नोव्हेंबर महिन्यात होणार होते लग्न
विशेष म्हणजे, मृत केतन आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार होते. ज्या मुलीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती, तिच्याच वाढदिवशी निसर्गाच्या सानिध्यात आनंद साजरा करायला गेलेल्या केतनवर काळाने घाला घातला. या धक्कादायक घटनेमुळे वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात मोठ्या शोकाकुळ वातावरणात झाले. दरम्यान, लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.
तर एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.