FIFA World Cup 2026: पुन्हा एका गोलकीपरची भन्नाट कामगिरी, घानाने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ४८ संघ खेळत आहेत. यामध्ये अनेक लहान देशांनी बलाढ्य संघांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करत फुटबॉल चाहत्यांना चकित केले आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय बुधवारी (२४ जून) आला, जेव्हा घानाने इंग्लंडला ०-० असे बरोबरीत रोखले आणि सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात इंग्लंडचा हॅरी केनने अखेरच्या क्षणी केलेली धक्कादायक चूक आणि घानाचा मांत्रिक नाना क्वाकू बोन्सम यांनी सामन्याआधी केलेल्या एका विचित्र दाव्याभोवती पुन्हा एकदा नव्या चर्चला सुरूवात झाली आहे.
बॉस्टनमध्ये झालेल्या या सामन्यानंतर घानाच्या चाहत्यांनी बोन्समची प्रशंसा केली. काहींच्या मते, या सामन्यातील केनची निराशाजनक कामगिरी बोन्समने केलेल्या दाव्यामुळे झाली. गट एलमध्ये असणाऱ्या या दोन्ही संघाचे अद्याप या स्पर्धेतील आव्हान कायम आहे. झाले असे की या सामन्याआधी बोन्समने इंग्लंडच्या कर्णधाराला शाप दिला होता. आता सामन्यानंतर त्या मांत्रिकाच्या आरोपांना सोशल मीडियावर जोर मिळाला असला, तरी मात्र इंग्लंडचे माजी खेळाडू वेन रुनी यांनी संघाच्या निराशाजनक निकालामागे थॉमस टुचेलची रणनीती आणि संघनिवड हीच खरी कारणे आहेत, असे सांगितले.
या स्पर्धेत इंग्लंडने चांगली सुरूवात केली होती. त्यांनी पहिल्याच सामन्यात क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवला होता, ज्यामध्ये केनने दोन गोल केले होते. आता संघाने घानाविरुद्ध विजय मिळवला असता तर ते ३२ संघांच्या बाद फेरीसाठी पात्र ठरले असते.
मांत्रिकाची चर्चा बाजूला सारली तर पुन्हा एका कमी प्रसिद्ध देशाच्या गोलकीपरने उत्तम कामगिरी केली. आहे. याआधी केप वर्देचा वोझिन्हा त्याच्या आव्हानात्मक कामगिरीने चर्चेत आला. आता घानाच्या बेंजामिन असारे याने अशी कामगिरी केली आहे.
बॉस्टनमध्ये ९० मिनिटांच्या खेळात इंग्लंडसमोर असारे उभा होता. या सामन्यात इंग्लंडने १९ शॉट्स मारले, तर घानाने केवळ २. मध्यंतरापूर्वी इंग्लंडकडे घानापेक्षा अधिककाळ बॉलचा ताबा होता आणि त्यांनी पहिल्या हाफमध्ये घानाला एकही प्रयत्न करू दिला नाही. तरीही ते ही पण एकही गोल करू शकले नाही. सामन्याच्या अंतिम क्षणी इंग्लंडने सर्वस्व पणाला लावले. निको ओ’रायलीच्या हेडरने बॉल क्रॉसबारला जोरात आदळला. केनने रिबाउंड बाहेर मारला. तेव्हा मार्क गुहीला वाटले की त्याला गोल करण्याची संधी मिळील, मात्र त्याचा हेडर अडवला गेला. सामना बरोबरीत सुटल्याने घानाने एक पाइंट मिळवला.
एल गटाच्या गुणतालिकेत इंग्लंड अव्वलस्थानी असून घाना दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा पुढील सामना २८ जूनला पनामाविरुद्ध आहे. त्याचदिवशी घाना क्रोएशियाशी भिडणार आहे.
Comments are closed.