20 वर्षांच्या सिया गोयलचा प्लान A फसला,पण प्लान B सक्सेसफुल, केतनला मारण्याचा प्लान C काय होता?
केतन अग्रवाल प्रकरण, पुणे: पुण्याच्या (Pune Crime) केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात (Ketan Agrawal) अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे झाले आहेत. आधी सर्वांना अपघातील मृत्यू वाटणाऱ्या प्रकरणात पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि होणाऱ्या नवऱ्याचा बॉयफ्रेंडसोबत मिळून काटा काढणाऱ्या सिया गोयल (Siya Goyal) हिचं पितळ उघडलं पडलं. केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याच्या मदतीनं त्याच्या हत्येचा कट रचला.
प्रत्यक्ष हत्येच्या चार दिवस आधीच, सिया गोयलनं केतनला दरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मारण्यासाठीचा तो प्लॅन A (Plan A) होता. जेव्हा प्लॅन A अयशस्वी ठरला, तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनं प्लॅन B (Plan B) आखला. इतकंच नाही तर, तो प्लॅनही फसला असता तर काय करायचं? यासाठी सियानं आधीच प्लॅन C (Plan C) देखील तयार ठेवला होता.
केतनला मारण्यासाठीचा प्लॅन A काय होता आणि तो का फसला? (Siya Goyal Ketan Agrawal Case)
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी ANI शी बोलताना धक्कादायक खुलासा केला, ते म्हणाले की, सिया आणि केतन यांनी लोहगड किल्ल्याला तीन वेळा भेट दिली होती. 14 जून रोजी, म्हणजेच हत्येच्या चार दिवस आधी, सिया केतनला लोणावळाला लोहगडावर घेऊन गेली. हा तिच्या कटाचा प्लॅन A होता. याच भेटीदरम्यान सियानं केतनच्या जीवावर पहिला प्रयत्न केला. तिनं त्याला किल्ल्यावरून दरीच्या दिशेनं ढकललं. पण, केतननं एका झुडपाला पकडलं आणि त्याचे प्राण वाचले. आपलं गुपित उघड होण्याच्या बेतात असतानाच सियानं चलाखीनं “साप! साप!” असं ओरडत केतनला जाऊन मिठी मारली. केतनला वाटलं की, तिथे खरोखरंच साप होता आणि सापापासून वाचवण्यासाठीच सियानं त्याला ढकललं होतं.
प्लॅन B फत्ते झाला खरा, पण तो जर फसला असता तर, प्लॅन C सुद्धा होता…
केतन अग्रवालच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. याच्या एक दिवस आधीच सियानं प्री-बर्थडे सरप्राइजच्या निमित्तानं केतन अग्रवालला लोणावळ्यातील लोहगढ किल्ल्यावर नेलं. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर होते, त्याचवेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसुद्धा तिथे उपस्थित होता. चेतननं त्याचा मोबाईल कोंढवामधल्या आपल्या घरी ठेवलेला, तसेच, त्याच्या मोबाइलचं इंटरनेट सकाळपासून बंद होतं. त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घातलेलं आणि चेहरा पूर्णपणे लपला जाईल, याची काळजी घेतलेली. चौकशीदरम्यान, एवढ्या भर उन्हात थंडी वापरलं जाणं हुडी कोण घालतं? असा संशय पोलिसांना आला आणि तिथेच सिया आणि चेतननं रचलेला मोठा कट फसला. हुडी घालून गडावर जातानाचा चेतनचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागला.
लोहगडावर केतन आपल्या मोबाईलनं फोटो काढत असतानाच सियानं त्याला दरीत ढकललं. त्यानंतर तिनं पोलिसांना फोन करुन सांगितलं की, केतनचा पाय घसरलाय आणि तो खाली पडला. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. सर्वांना अपघाती मृत्यू वाटला आणि सिया गोयलचा प्लॅन B (Plan B) यशस्वी झाला.
सिया गोयलचा प्लॅन C सुद्धा रेडी होता?
केतनच्या वडिलांचा आरोप आहे की, सियानं त्यांच्या मुलाच्या हत्येचा मोठा कट रचला होता. जर लोहगडावर प्लॅन B अयशस्वी ठरला असता, तर महाबळेश्वरमध्ये केतनचा जीव घेण्याचा सियाचा इरादा होता. तिनं चेतनच्या मदतीनं आधीच प्लॅन C (Plan C) तयार करून ठेवला होता.
केतन, सियामध्ये वारंवार उडायचे खटके
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दोघांचं लग्न ठरलेलं, त्यानंतर साखरपुडाही ठरलेला. पण, त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी क्राइम ब्रांच आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास करुन प्रकरणाचा छडा लावला.
नेमकं प्रकरण काय?
पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालंय. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अगरवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय..सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता..यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं.
VIDEO पुण्यातल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा रक्तरंजित थरार, Inside Story
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.