ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवर फैसला

Operation Tiger : पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवर (Operation Tiger) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) फैसला करण्याची शक्यता आहे. टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या प्रकरणात पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या नेत्यांनी अध्यक्षांची दोन वेळा भेट घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील होण्याचे पत्र दिले आहे. लोकसभा सचिवालयातच कायदेशीर आणि घटनाविषयक तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळे बसवण्याच्या प्रश्नावरही निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संविधानाचे उल्लंघन होईल असे पाऊल उचलले जाऊ नये : अरविंद सावंत

दरम्यान, ऑपरेशन टायगरनंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ठाकरेंच्या खासदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावले होते. या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकत्रिकरणाचा प्रस्ताव दिला असेल तर त्यावर विचार होऊ नये. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी मला कळवावं ही विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली. सहा जणांबाबत जरी दोन तृतीयांश असेल तरी आमचं काही म्हणणं आहे. संविधानाचे उल्लंघन होईल असे पाऊल उचलले जाऊ नये. न्यायिक भूमिका घ्यावी अशे मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केले. 

आमचं म्हणणं ऐकल्याशिवात निर्णय देऊ नये : अनिल देसाई 

लोकसभा अक्ष्यक्ष ओम बिर्ला यांनी आम्हाला भेटीसाठी पाचारण केलं होतं. कोणी एखादा गट बनवला असेल. पण संविधानातील तरतुदी तंतोतंत पाळाव्यात.शिवसेना विधिमंडळ पक्षाचे 9 सदस्य आहेत, त्यांनी जर गट बनवला असेल आणि त्यांनी काही व्यवस्था मागितली असेल तर दोन तृतीयांश विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांची सहमती लागेल. त्यांनी काय मागणी केली आहे ते आम्हाला कळू द्या असे मत खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केले. विधीमंडळ पक्षाची जबाबदारी अमच्याकडे आहे. आमचं म्हणणं ऐकल्याशिवात निर्णय देऊ नये असे अनिल देसाई म्हणाले.  याबाबतीत त्यांनी निश्चितपणे न्याय करु असे आश्वासन आम्हाला दिल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

ओमराजे निंबाळकर ऑपरेशन टायगर: ओमराजे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचा चपराक निर्णय काल धाराशिवची कार्यकारिणी बरखास्त करून आज तात्काळ 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर