सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चे
केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी त्याची भावी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचे कबूल केले असून न्यायालयाने दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: तोलामोलाचा नसल्याने चेतनला नकार, केतनशी ठरले लग्न
बी.कॉमचे शिक्षण घेता घेता केक विक्रीचा व्यवसाय सुरू करणारी 20 व्या वर्षीय सिया गोयल ही मार्केटयार्ड परिसरातील ओळखीमधून क्रिकेटर असलेल्या 23 वर्षीय चेतन चौधरीच्या प्रेमात पडली. दोघांनीही लग्नासाठी हट्ट धरला होता, मात्र सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांच्या मोठ्या व्यवसायाच्या तुलनेत चेतनची आर्थिक परिस्थिती कमी होती. चेतन हा व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा असला आणि रणजी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत असला, तरी गोयल कुटुंबाला तो आपल्या तोलामोलाचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी चेतनला नकार देऊन सिम्बॉयसिस आणि युएसमधून (US) उच्चशिक्षण घेऊन आलेल्या व वडिलांच्या बांधकाम व्यवसायात उतरलेल्या 25 वर्षीय केतन अग्रवालशी सियाचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात करून दिला. नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: बालीचा बेत फसल्यानंतर लोहगडावर रचला मृत्यूचा सापळा
साखरपुडा झाल्यानंतर चेतनसोबत पळून गेल्यास कुटुंबाची समाजात मोठी बदनामी होईल, या भीतीने नराधम सियाने थेट होणारा पती केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला. तपासात उघड झाले की, यापूर्वी त्यांचा बाली (Bali) येथे हत्येचा बेत होता जो अयशस्वी ठरला. त्यानंतर 14 जून रोजीही सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते, पण त्या दिवशी धाडस न झाल्याने कट पूर्ण झाला नाही. अखेर 19 जून रोजी सियाचा वाढदिवस (Birthday) असल्याने, तिने आदल्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी केतनकडे लोहगडला ट्रेकिंगसाठी (Trekking) जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार प्रियकर चेतन चौधरी आधीच तिथे पोहोचला होता. केतन पुढे चालत असताना चेतनने मागून येत सियाच्या मदतीने केतनला खोल दरीत ढकलून दिले आणि केतनचा पाय घसरल्याचा बनाव केला.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: बहीण संजनाच्या प्रश्नांची सरबत्ती अन् पोलिसांचा संशय
केतनच्या मृत्यूनंतर 21 जून रोजी कुटुंबीय लोहगडावर गेले असता, हा अपघाती मृत्यू नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर जेव्हा सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेव्हा केतनची बहीण संजना हिने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली. “लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का?” या प्रश्नांमुळे सिया गोंधळली आणि अनुत्तरित झाली, ज्यामुळे संजनाचा संशय बळावला.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: CCTV फुटेज आणि CDR तपासाने फुटले बिंग
पोलिसांनी सिया आणि चेतनचे सीडीआर तपासले असता, गेल्या वर्षभरात त्यांच्यात 2004 वेळा फोन कॉल्स आणि 300 तासांपेक्षा जास्त संवाद झाल्याचे उघड झाले. 18 जून रोजी चेतनचे फोन लोकेशन मार्केटयार्ड दाखवत होते, पण लोहगडच्या सीसीटीव्हीत (CCTV) एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून सियाला काहीतरी खुणावताना दिसला. पोलिसांनी तपास केला असता समोर आले की, चेतन स्वतःचा फोन दुकानातील कामगाराकडे ठेवून, त्या कामगाराचा फोन घेऊन लोहगडावर आला होता. 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच चेतन आणि सियाचे हे भयंकर बिंग फुटले.
Ketan Agrawal: कोण आहे केतन अग्रवाल?
– केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
– 25 वर्षीय केतनने सिम्बॉयसिसमधून बीबीएचे शिक्षण घेतले असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता.
– दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करून तो भारतात परतला आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला.
– गेल्या वर्षी त्याने स्वतःचे बांधकाम प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात केली.
– फेब्रुवारी महिन्यात त्याचा सिया गोयलसोबत साखरपुडा झाला होता.
– मात्र, नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.
Siya Goyal: कोण आहे सिया गोयल?
– सिया गोयल ही पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या आहे.
– 20 वर्षीय सिया बी.कॉमचे शिक्षण घेत आहे.
– गोयल कुटुंबीयांचा ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय आहे.
– सियासाठी मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीसाठी स्वतंत्र बेकरी सुरू करून देण्यात आली होती.
Chetan Choudhari: कोण आहे चेतन चौधरी?
– 23 वर्षीय चेतन चौधरीने बीबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.
– गेल्या दोन वर्षांपासून तो मार्केटयार्ड परिसरातील वडिलांचा ड्रायफ्रूट्स आणि किराणा व्यापाराचा व्यवसाय सांभाळत आहे.
– चेतन एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असून रणजी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते.
आणखी वाचा
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.