FIFA World Cup 2026: व्हिनिसियस ज्युनियरची ऐतिहासिक कामगिरी अन् ब्राझीलचे पुन्हा विश्वविजेता बनण्याचे संकेत, योगायोग चक्रावून टाकणारा
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये एकदाचा नेमार खेळला, मात्र सामना गाजवला व्हिनिसियस ज्युनियरने. या २५ वर्षीय खेळाडूने बुधवारी (२४ जून, स्थानिक वेळेनुसार) स्कॉटलंडविरुद्ध दोन गोल या स्पर्धेमधील आपली उत्कृष्ट मोहीम सुरू ठेवली आहे. हा सामना ब्राझीलने ३-० ने जिंकत ३२ संघाच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.
व्हिनिसियस या सामन्याच्या सातव्या मिनिटाला पहिला गोल केला आणि मध्यंतराच्या अगदी आधी दुसरा गोल करून स्पर्धेतील आपल्या गोलची संख्या चारवर नेली. या सामन्यातही त्याने त्याचा फॉर्म कायम राखत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. याबरोबरच त्याने एका विक्रमाची बरोबरी केली आहे. तो फिफा विश्वचषकातील आपल्या देशाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये गोल करणारा २४ वर्षांमधील पहिला ब्राझीलियन ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे ब्राझील यंदा विश्वविजेता बनण्याबद्दल एक जबरदस्त योगायोग जुळून आला आहे.
झाले असे की, पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या एकाच आवृत्तीमधील तिन्ही साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये ज्या आधी चार खेळाडूंनी गोल केले, तेव्हा ब्राझीलने विश्वचषकावर नाव कोरले आहे. १९७० मध्ये जैरझिनो, १९९४ मध्ये रोमारिओ आणि २००२ मध्ये रोनाल्डो नाझरियो आणि रिवाल्डो यांनी अशी कामगिरी केली होती. आता व्हिनिसियसने आपल्या संघाच्या पहिल्या तिन्ही साखळी सामन्यांमध्ये गोल केले आहे आणि या महान खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या विक्रमामध्ये एक खास बाब म्हणजे, ब्राझीलने १९७०, १९९४ आणि २००२ या तिन्ही वर्षी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. आता व्हिनिसियसनेही त्या महान खेळाडूंसारखी कामगिरी केली असल्याने ब्राझील पुन्हा विश्वविजेता बनणार याची चर्चा सुरू झाली आहे.
सामन्याची स्थिती पाहिली तर, स्कॉटलंडला बॉलवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. व्हिनिसियसने सातव्या मिनिटाला गोल केल्याने ब्राझीलला सुरूवातीला आघाडी मिळाली. या स्पर्धेच्या आधीच्या सामन्यांमध्ये व्हिनिसियसने आपली छाप सोडली आहे. त्याने पहिल्या हाफमध्ये आणखी एक गोल केल्याने दुसऱ्या हाफची सुरुवात ब्राझीलने २-० अशा भक्कम आघाडीने केली. मॅथियस कुन्हाने ६० मिनिटाला गोल करत ब्राझीलची आघाडी आणखी वाढवली.
Comments are closed.