मुंबई क्रिकेटमध्ये संदीप पाटील मार्गदर्शकपदी
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांची मुंबई क्रिकेट संघांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रामुख्याने खेळाडूंचा विकास आणि रणनीतीविषयक मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करतील. त्याचबरोबर एमसीएने भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू अरुंधती घोष यांची महिला स्पर्धा समन्वयव म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतासाठी संदीप पाटील १९८० ते १९८६ या काळात २९ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या नवीन भूमिकेत खेळाडूंचा विकास, रणनीतीविषयक प्रशिक्षण आणि गुणवान खेळाडूंची निवड यांसारख्या जबाबदाऱ्या पाटील पार पाडतील. ‘एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले संदीप पाटील एमसीएच्या पुरुष संघांना मार्गदर्शन करतील. ते सर्व स्तरांवरील खेळाडू आणि प्रशिक्षकांना रणनीतीविषयक मार्गदर्शन, तांत्रिक कौशल्य, नेतृत्व विकास याबाबत पाठिंबा देतील,’ असे एमसीएने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
Comments are closed.