IND vs IRE: वैभव सूर्यवंशीसोबत आणखी एका राजस्थानच्या खेळाडूला पदार्पणाची प्रतीक्षा! मात्र आहे एक मोठा ट्विस्ट
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२६ जून) खेळला जाणार असून यामध्ये श्रेयस अय्यरचे कर्णधार म्हणून पदार्पण होणार आहे. टी२० विश्वचषक विजेता सूर्यकुमार यादवलकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर बीसीसीआयने संघाचे सूत्रे अय्यरला सोपवली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त या मालिकेत वैभव सूर्यवंशीवरही लक्ष असेल, जो भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.
१५ वर्षीय वैभवची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. जर त्याला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू बनेल. त्याचबरोबर राजस्थानच्या आणखी एका खेळाडूवर लक्ष असणार आहे. जस मुंद्रा या मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. यामध्ये एक ट्विस्ट आहे, त्याचे पदार्पण भारतासाठी नाही, तर आयर्लंडसाठी असेल.
राजस्थानमधील टोंक जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या जय मुंद्राची भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवड झाली. २८ वर्षीय खेळाडू एमटेक पदवी घेण्यासाठी २०२१ मध्ये विद्यार्थी व्हिजावर आयर्लंडला गेला होता. त्या काळात त्याने क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. २०२५ मध्ये त्याने आयरिश नागरिकत्व मिळवले आणि आता त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. त्याने त्याच्या आक्रमक गोलंदाजी आणि प्रभावी फलंदाजीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. त्याची २६ जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी आयर्लंडसाठी पदार्पण होऊ शकते.
जयची आयर्लंड संघात निवड झाल्याबद्दल त्याच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण असल्याचे त्याच्या आईने माध्यमांना सांगितले. तसेच त्याची निवड झाल्यानंतर त्याची बहिण मानसी म्हणाली, माझ्या भावाचे स्वप्न साकार झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. तो शिक्षण घेत होता आणि त्याला नोकरीही लागली होती, मात्र त्याने नेहमी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या प्रचंड मेहनतीने तो निवड समितीच्या नजरेत आला.
यावरून ही मालिका पदार्पण विशेष असून दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.
आयर्लंड दौऱ्याच्या टी २० मालिकेसाठी टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.
Comments are closed.