कोणाचंही घर बॉम्बने उडू देणार नाही, धमक्या देणाऱ्यांना पोलीस योग्य उत्तर देतील: देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस संजय दिना पाटील यांच्यावर शिवसेना ठाकरे गटातून (Shiv Sena UBT) फुटून बाहेर पडलेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद आता अत्यंत शिगेला पोहोचला आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्यामुळे प्रचंड राजकीय तणाव निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis: नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणाचाही घर बॉम्बने आम्ही उडू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरू ही नये. कोणी धमक्या देत असेल तर पोलीस त्याला योग्य उत्तर देतील,” असे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Dina Patil vs Sanjay Raut: संजय राऊतांचा ‘लेटर बॉम्ब’

खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे,” असा आरोप राऊतांनी केला आहे.

Sanjay Dina Patil vs Sanjay Raut: पत्रात संजय पाटलांच्या ‘त्या’ धमकीचा उल्लेख

संजय राऊत यांनी पत्रात पुढे दावा केला आहे की, संजय पाटील म्हणतात, “माझ्या नावाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन.” एवढेच नव्हे तर, “मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे. माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन,” अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे. या 5 लोकांच्या हत्येची कबुली आरोपीने स्वतःच दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Sanjay Dina Patil vs Sanjay Raut: घराची झाडाझडती घेण्याची मागणी

संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना खासदार पाटील यांच्या घराची झाडाझडती घेण्याची विनंती केली आहे. “खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच यूएपीए कायद्याखाली अटक होणे गरजेचे आहे,” अशी मागणी देखील राऊतांनी पत्रात केली आहे. यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा

Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात

Comments are closed.