‘त्याला सात मुली अन् पत्नी आहे, पण सर्वांनी भीमराव कांबळेला नाकारलं; नराधमाला शिक्षा सुनावतान

Nasrapur Verdict Girl Case Bhimrao Kamble: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली होती आणि आज या खटल्याचा निकाल सुनावण्यात आला. न्यायाधीशांनी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला दोषी ठरवले. यानंतर न्यायाधीशांनी शिक्षेबाबात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून काही निरीक्षणे नोंदवली. (Nasrapur Rape case)

न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी म्हटले की, आरोपीला सात मुली, मुलगा आहे, पत्नी आहे, मात्र कोणीही त्याची बाजू घ्यायला पुढं आलेले नाही. तो एकटा राहत होता. समाजाने या आरोपीचे अस्तित्त्व नाकाराले आहे. न्यायालयाने या आरोपीला विचार करायला वेळ दिला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला काही प्रश्न विचारले. मात्र, त्यावर तो निरुत्तर झाला. आरोपीला सुनावणी दरम्यान गप्प राहण्याचा मात्र तो पॅसिव्ह राहू शकत नाही. हा गुन्हा अत्यंत दर्मिळ, घृणास्पद आणि अमानवयी आहे. न्यायालयाने आरोपीला अनेकदा प्रश्न विचारले. मात्र, त्यावेळी तो गप्प राहिला. आरोपीची मेंटल हेल्थ आणि पोटंन्सी रिपोर्ट हे सिद्ध करतोय की तो मेंटली फीट आहे आणि तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम आहे. गुन्हेगाराला कोणताही पश्चाताप झाल्याचे दिसत नाही. सुनावणीच्या 20 दिवसांमध्येही आरोपीला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तो फक्त स्वत:चा बचाव करत होता, या बाबी न्यायाधीशांनी अधोरेखित केल्या.

Bhimrao Kamble: न्यायाधीशांनी नराधमाला विचारलं, सांग तुला कोणती शिक्षा द्यावी, भीमराव कांबळे म्हणाला…

आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, ‘तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?’, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती”, असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की ” आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी ” . न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.

आणखी वाचा

Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, ‘तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?’, नराधम म्हणाला मी….

Comments are closed.