भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, ‘तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?’, नराधम

नसरापूर खटल्याचा निकाल : नसरापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. नसरापूर प्रकरणात (Nasrapur Rape Case) विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करुन या खटल्याची विक्रमी वेळेत सुनावणी झाली होती. आज न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) दोषी असल्याचा निकाल दिला. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षा़ंच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. (Pune Crime Nasrapur Case )

दरम्यान. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, ‘तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?’, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती”, असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की ” आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी ” . न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.

यानंतर सरकारी वकिलांनी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने 39 मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.

आणखी वाचा

Nasrapur Case Verdict Updates: नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी, काय शिक्षा होणार?

Comments are closed.