मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, धर्मेंद्र प्रधानांना डच्चू मिळणार? श्रीकांत शिंदें

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान द्यायचे आणि कोणाला डच्चू द्यायचा, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेत्यांमध्ये 20 जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सखोल चर्चा झाली. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळ विस्तारात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळू शकते. पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या दोन कार्यकाळात बरोबर दोन वर्षांनी जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ फेरबदल झाले होते. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Union Government Cabinet Expansion)

देशभरात केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चा जोरात असून पाच ते सहा दिवसांपूर्वी म्हणजेच साधारणतः 19-20 जून पर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा , विचारमंथन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे पूर्ण झाल्याचे समजते. याबाबतची औपचारिक घोषणा बाकी असून गेल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यामुळे नव्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते असा अंदाज आहे.

मोदींचा पहिला कार्यकाळ – 5 जुलै 2016 रोजी झालेला फेरबदल

मोदींचा दुसरा कार्यकाळ – 6-7 जुलै 2021 रोजी झालेला मंत्रिमंडळ फेरबदल

Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना या बाबींची विचार होणार?

– उत्तरप्रदेश, गुजरात , पंजाब , कर्नाटक , गोवा , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , मणिपूर या राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका

– आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक असलेली मोर्चेबांधणी , संघटनात्मक बांधणी

-आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी आवश्यक NDA घटकपक्षांची मदत

– पहिल्या दोन वर्षातील मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्टकार्ड

– अकार्यक्षम मंत्र्यांना दाखवला जाणार घरचा रस्ता

– तरुण चेहऱ्यांना दिले जाणार प्राधान्य

– राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भविष्यातील कार्यकारिणी/ टीमचा विचार

Modi Government new possible Cabinet: पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात काय बदल होण्याची शक्यता

* केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल रविवार किंवा सोमवारी होण्याची शक्यता आहे.
* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन फेरबदलासाठी रविवार किंवा सोमवार या दोन दिवसांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
* माजी RBI गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता.
* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मानव संसाधन विकास (HRD) खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.
* धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंह पुरी यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता.
* एनडीएमध्ये सहा खासदार आणल्याबद्दल शिवसेनेला बक्षीस मिळू शकते. खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता.
* अनुराग ठाकूर यांची पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून एन्ट्री होऊ शकते.
* मेरठचे खासदार अरुण गोविल यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
* उत्तर प्रदेशातील प्रभावी नेते आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते.
* पंजाबमधील आप सोडून आलेल्या नेत्यांना बक्षीस मिळण्याची शक्यता. राघव चड्ढा आणि अशोक मित्तल(Lovely Professional University) यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळू शकते.
* सध्याचे केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची जागा तरुण चुग यांना मिळण्याची शक्यता. पंजाब निवडणुकांसाठी RSS पार्श्वभूमीचे चुग यांना महत्त्व दिले जाऊ शकते.
* नितीश कुमार यांचे केंद्रातील राजकीय महत्त्व कायम असून त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता.
* शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून आरोग्य राज्यमंत्रीपद काढून घेऊन ते संजय दिना पाटील यांना दिले जाऊ शकते. मात्र, जाधव यांच्याकडे आयुष खाते कायम राहण्याची शक्यता आहे.
* मनोहर लाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा (Power) खाते काढून घेतले जाऊ शकते.
* खजुराहोचे खासदार विष्णू दत्त शर्मा यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता.
* बिहारमधील महाराजगंजचे खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता.
* याशिवाय, सुमारे सहा राज्यमंत्र्यांना (MoS) मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

Comments are closed.