वाद झाल्यानंतर प्रवाशांनी दोघांना वेगळं केलं, पण बॅगेत चाकू असल्याचं आठवलं अन्…; लोकल मधील ‘त
मुंबई : मुंबई लोकलमध्ये पावसात दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून तरुणाची हत्या झाल्याची भयंकर घटना मंगळवारी रात्री घडली. मयंक लोहार (२२) असे हत्या झालेल्या (Mumbai Local Train) तरुणाचे नाव आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेल्या चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ही थरकाप उडवणारी घटना घडली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धावत्या लोकांमध्ये प्रवाशाची सुरा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाने सुरा ऑनलाइन विकत घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. हत्येच्याच दिवशी रोशन सुवर्णाने सूर्याचे ऑनलाइन (Mumbai Local Train) खरेदी केल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यानंतर मित्राला देण्यासाठी त्याने तो चाकू आपल्या बॅगेतच ठेवला होता. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून सुवर्णा आणि मयंक यांच्यात वाद झाला आणि मारामारी देखील झाली. सोबतच्या प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळं देखील केलं आणि लांब उभ केलं. मात्र वेगळं केल्यानंतर सुवर्णाने त्याच्या बॅगेतून सुरा काढला आणि मयंकच्या छातीत आणि पोटात एकूण तीन ते चार वेळा खुपसला.(Mumbai Local Train)
Mumbai Local Train : रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रवासी..
सुरा हातात घेऊन उभा असलेला प्रवासी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुसरा प्रवासी हे दृश्य बघून डब्यातील इतर प्रवासी हादरून गेले आणि कोणी त्यानंतर सुवर्णाच्या नादी लागलं नाही. बोरिवली स्थानकात लोकल येताच सुवर्णाने धावत्या लोकल मधून उडी मारली आणि पसार झाला. सुरा देखील त्याने बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातच कुठेतरी फेकला असून त्याचाच सध्या पोलीस शोध घेत आहेत. मालाड ट्रेनमध्ये प्रवाशाच्या हत्या केल्याप्रकरणी अटक आरोपीने त्याच्या मित्र अँमेझॉन कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा परमार याकडून दोन चाकू घेतले होते.(Mumbai Local Train)
Mumbai Local Train : एक चाकू घरी ठेवला होता एक बॅगेत ठेवला होता
तर ॲमेझॉनचा डिलिव्हरी बॉय परमार आणि आरोपी हे दोन्ही एकमेकांना भेटत होते. परमारकडून आरोपींने दोन चाकू विकत घेतल्यानंतर एक चाकू घरी ठेवला होता एक बॅगेत ठेवला होता. आरोपी आणि मयत व्यक्ती मयंक लोहार सोबत त्या दिवशी ट्रेनमध्ये दरवाजावर पाणी येत असल्या कारणाने वाद झाला, यावेळी आरोपीच्या लक्षात आला माझ्या बॅगेत चाकू आहे आणि त्यांनी चाकू काढून मयत मयंक लोहारवर चाकूने वार केला.
Mumbai Local Train : हत्येसाठी वापरलेला चाकू फेकून दिल्याचेही त्याने जबाबात नमूद
आरोपीच्या म्हणण्यानुसार, चाकूचे वार होताच डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, लोकल बोरिवली स्थानकाजवळ पोहोचत असताना ट्रेनचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर रेल्वे सबवेमधून पश्चिमेकडे पळून जाताना हत्येसाठी वापरलेला चाकू फेकून दिल्याचेही त्याने जबाबात नमूद केले आहे. तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली आहे. आरोपीने आपल्या एका मित्राकडे दोन चाकू पाहिले घेतले होते. त्यापैकी एक चाकू घरी ठेवला होता, तर दुसरा चाकू त्याने आपल्या बॅगेत बाळगत असल्याचा दावा त्याने केला आहे. मद्यधुंद अवस्थेत तो सहसा ओला किंवा उबेरने प्रवास करत असे; मात्र त्या दिवशी लोकलमध्ये गर्दी कमी असेल असे वाटल्याने रेल्वेने प्रवास केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
Mumbai Local Train : रिक्षा पकडून त्याने कोरला परिसरात जाऊन एका ठिकाणी लपला
दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या जबाबातील प्रत्येक दाव्याची स्वतंत्र पडताळणी केली जात असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात येत आहे. ट्रेनमध्ये हत्या केल्यानंतर आरोपी बोरिवली पश्चिम मधून बांद्राला गेला. यानंतर रिक्षा पकडून त्याने कोरला परिसरात जाऊन एका ठिकाणी लपला होता. बोरिवली जीआरपी पोलिसांनी आरोपीचा वडिलांना विलेपार्ले परिसरामधून ताब्यात घेतल्यानंतर आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आला. आरोपी आणि त्याचे वडील दोन्ही एकत्र विलेपार्ले कार्गो परिसरामध्ये क्यूआर कोड स्कॅनिंगचे काम करत होते.
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.