विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार? उदय सामंतांकडून काँग्रेस नेत्याला मोठी ऑफर; म्
Uday Samant on Vijay Wadettiwar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असलेल्या राजकीय खेळींमुळे विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या यशस्वी पक्षांतरानंतर आता शिंदे गटाने आपला मोर्चा थेट काँग्रेसच्या गोटात वळवला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना जाहीरपणे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. वडेट्टीवार यांच्यासारखा लोकांशी नाळ जुळलेला ताकदीचा नेता पक्षात आला, तर आपल्याला सर्वाधिक आनंद होईल, असे सूचक वक्तव्य सामंत यांनी केले आहे.
Uday Samant on Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार यांच्या पक्षप्रवेशावर उदय सामंत काय म्हणाले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “विजय वडेट्टीवार हे आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांचे देखील ते जवळचे मित्र आहेत. पक्ष प्रवेशाच्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवार यांच्या सारखा विदर्भातील एक ताकदीचा नेता, लोकांमधील नेता ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे. त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. कारण मी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत देखील काम केलेले आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. आता उदय सामंत यांच्या ऑफरवर विजय वडेट्टीवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Uday Samant: ठाकरे गटाला लागलेली गळती आणि ‘ऑपरेशन टायगर 3’ची चर्चा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटाने व्हिप (whip) जारी करूनही या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. या धक्कादायक घडामोडींनंतर आता शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर 3’ (Operation Tiger 3) सक्रिय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदारांनी अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्र्यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 यापेक्षा रोजच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहेत. प्रत्येक ऑपरेशन ला नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन, असं 365 पर्यंत नंबर द्यावे लागतील. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर ते आम्ही का नाकारावे? ते जर पक्षात येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावे? पण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये अशी परिस्थिती आणि वातावरण निर्माण झाले आहे, हे नाकारता येत नाही,” असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.