केवळ टक्कलच नव्हे तर केतनची आणखी एक गोष्ट खटकायची, पोलीस तपासात सिया घडाघडा बोलली
केतन अग्रवाल आणि सिया गोयल: पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतन अग्रवाल याची त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन (Lohagad Fort) ढकलून देत हत्या केली होती. या घटनेमुळे पुण्यासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या हायप्रोफाईल प्रकरणात आता पोलीस चौकशीदरम्यान सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे. सिया गोयल (Siya Goyal) हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. तिचे चेतन चौधरी (Chetan Chaudhari) या तरुणांशी प्रेमसंबंध होते. सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सियाला केतन (Ketan Agrawal) हा मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. याशिवाय, केतन बोलताना अडखळायचा. सिया आणि केतनचे लग्न ठरले तेव्हा गोयल कुटुंबाला या गोष्टीची माहिती होती. मात्र, त्यांना याचे फारसे विशेष वाटले नाही. परंतु, या दोन गोष्टींमुळे सियाला कितीही प्रयत्न करुनही केतन अग्रवाल पसंत पडत नव्हता. याशिवाय, मुख्य गोष्ट म्हणजे सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते. (Pune Crime news)
केतनची हत्या करण्याऐवजी तू घरच्यांना सांगून सरळ लग्नाला नकार का दिला नाहीस, असा प्रश्नही सिया गोयल हिला पोलिसांनी विचारला. त्यावर ती म्हणाली की, मला माझ्या कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. हे लग्न मोडले असते तर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला मार्गातून कायमचा दूर करणे, हा सर्वात सोपा उपाय वाटला, असे सियाने सांगितले. केतन लोहगडावर ट्रेकिंगला गेला असताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यावर फारसे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. गडावर फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही गोष्ट कोणालाही समजणार नाही, असे सिया गोयल हिला वाटत होते.
दरम्यान, पोलिसांनी सिया गोयल हिला अटक केल्यापासून तिच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तिला भेटायला आलेली नाही. सियाचे वडील हे सध्या रुग्णालयात आहेत. लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी तिचा भाऊ साहील गोयल चौकशीसाठी बोलावले आहे. तो सध्या पोलीस ठाण्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.