Ketan Agarwal Case केतनचे टक्कल अन तोतरेपणा खटकायचा, पोलीस चौकशीत सियाची धक्कादायक माहिती

प्रियकराच्या मदतीने होणार्‍या नवर्‍याला लोहगडावरून ढकलून देउन खून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्षष्ट झाले आहे. व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. केतनला टक्कल असल्यामुळे तो केसांचा विग वापरत होता. तसेच तो बोलण्यातही अडखळत (तोतरेपणा) असल्याचा दावा होणारी पत्नी सिया गोयल हिने केला होता. त्यामुळे केतन तिला पसंत नसल्यामुळे तिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.

केतन विशाल अगरवाल (वय २५ रा. लोढा बेलमोंडो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिया प्रविण गोयल (वय २० रा. लिलाकुंज, ७८ / २१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी) चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१ कोंढवा बु ता. हवेली) यांना अटक केली आहे.

पुणे- पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन आणि मार्वेâटयार्डातील मसाले विक्रीचे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया यांचा साखरपुडा झाला होता. तत्पुर्वी केतनच्या वडिलांनी मुलाला टक्कल असून, तो केसांचा विग वापरत असल्याची माहिती सियाच्या कुटूंबियाला दिल्याचे सांगितले आहे. मात्र, केतन बोलण्यातही अडखत होता. त्याला केसांचा विग असल्याचा दावा सियाने केला. मात्र, लग्न मोडून कुटूंबियाची बदनामी टाळण्यासाठी तिने यासंदर्भात वाच्यता केली नाही. सियाला केतनसोबत लग्न करणे मान्य नसल्यामुळे तिने आरोपी बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने लोहगडावरून ढकलून देत १८ जूनला केतनचा खून केला.

केतनच्या दोन गोष्टी सियाला खटकल्या

केतनमधील दोन उणीवा सियाला खटकल्या होत्या. टक्कल असल्यामुळे तो डोक्यांवर सतत केसांचा विग लावत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. तसेच बोलताना अडखळत असल्यामुळे सियाला साखरपुड्यानंतर माहिती झाले होते. लग्नानंतर आपल्याला याच्यासोबत राहावे लागेल, याचीही तिला चिंता होती. त्यातच तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हा केतनपेक्षा जास्त स्मार्ट असल्याचे सियाला वाटत होते.

कुटुंबियांना दुखवण्याऐवजी केतनलाच दूर केले

साखरपुड्यानंतर ठरलेले लग्न मला मोडून कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. जर आमचे लग्न मोडले असते तर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला आपल्यातून बाजूला काढण्याचा पर्याय योग्य वाटला. त्यासाठी गुगल सर्चद्वारे माहिती घेउन, लोहगड ट्रेकींग रेकी करीत प्लॅन यशस्वी केल्याची कबुली सियाने दिली आहे. ट्रेकिंगवेळी केतनचा मृत्यू झाल्यास जास्त संशय येणार नाही. गडावर फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही गोष्ट कोणालाही समजणार नसल्याचे सियाला वाटले. त्यामुळे तिने केतनची हत्या केली.

सियाच्या भावाची पोलिसांकडून चौकशी

आरोपी सिया गोयल हिचे वडील हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) तिचा भाऊ साहील गोयल याला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच्याकडे पोलिसांनी विविध प्रश्नोत्तरे करीत माहिती घेतली आहे. तो सध्या पोलीस ठाण्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.

विशाल अगरवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

केतन अग्रवाल यांच्या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी शुक्रवारी (दि.२६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे. दरम्यान, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. विशेष सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी अगरवाल कुटुंबियांनी केली आहे. याबाबत फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना निर्देश दिले आहेत.

Comments are closed.