सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल अन् 45 मिनिटांत …
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरुन केतन अग्रवाल ढकलून देत त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं सिया गोयल आणि चेतन चौधरीनं खून केल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी 18 जूनला केतन अग्रवालचा खून केला होता. या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
Ketan Agrawal Case : केतन अग्रवालचा खून 45 मिनिटांमध्ये
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या 45 मिनिटात झाल्याची माहिती समोर आली आहे. 18 जूनला सकाळी 8.41 वाजता उर्से टोलनाक्यावरुन पुण्याच्या बाजूनं केतन अग्रवालची गाडी पास झाली. तिथून ते एका तासात लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावरील तिकीट खिडकीत सीसीटीव्हीतील कॅमेऱ्यात दिसून आला. त्यानंतर चार पाच मिनिटात चेतन चौधरी तिथून जाताना पाहायला मिळालं. सिया 30 मिनिटात किल्ल्यावर पोहोचली. चेतन चौधरी केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा पाठलाग करत मागोमाग जात होता. चेतन चौधरी यानं त्या दोघापांसून काही अंतर ठेवलं होतं.
केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे तिघे किल्ल्यावर 10.15 वाजता पोहोचले. त्यांनतर केतन अग्रवाल याला धक्का मारुन दरीत ढकलण्यात आलं. यानंतर 10.40 वाजता सिया गोयल हिनं केतन अग्रवालच्या आईला फोन करत तो किल्ल्यावरुन खाली पडल्याचं सांगितलं. यानंतर सियानं किल्ल्यावर असलेल्या लोकांकडे मदत मागितली.
सिया आणि चेतन यांनी केतनला धक्का देण्यासाठी नियोजन केलेलं होतं. सिया खाली बसली आणि तिनं चेतनला इशारा केला, यानंतर चेतननं मागून केतन अग्रवालला धक्का दिला. 10.30 वाजता लोहगड किल्ल्यावरील तिकीट खिडकीच्या सीसीटीव्हीत चेतन चौधरी खाली येत असताना दिसून आला. म्हणजेच केतन अग्रवालचा खून करण्याचा प्लॅन सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी 45 मिनिटांमध्ये पूर्ण केला.
चेतन चौधरी आणि सिया गोयलकडून मेसेज डिलीट
केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनेस्वतःच्या मोबाईल मधील सर्व मेसेज डिलीट केले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेनंतर तीन दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यानच्या काळातील सर्व कॉल आणि मेसेज या दोघांनी डिलीट केले आहेत. या दोघांच्या मोबाईलमध्ये एकमेकांचे शेकडो मेसेज असल्याची माहिती समोर आली आहे. मेसेज रिक्व्हर करण्यासाठी दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले असल्याची माहिती आहे.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.