शिवसैनिकांचं जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत शिवसेना राहील, कोणी संपवू शकणार नाही : उद्धव ठाकरे

नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे त्या सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं आज उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वागताला पोहोचलेल्या शिवसैनिकांना थोडा वेळ संबोधित केलं. विरोधकांच्या कितीही पिढ्या शिवसेना संपवण्यासाठी उतरले तरी शिवसेना संपवू शकणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते : उद्धव ठाकरे

शिवसेना हे प्रकरण काय आहे हे विरोधकांना कळलेलं नाही, त्यांच्या कळण्याच्या पलीकडील आहे. दोन चार गद्दार फोडले तर शिवसेना संपून जाईल असं त्यांना वाटतं. पण असे अनेक गद्दार आमच्यातून निघून गेले तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर, कडवट, निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कोणाच्या कितीही पिढी उतरल्या तरी संपणार नाही आणि संपवू शकत नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की आज मी यवतमाळला चाललो आहे.पण आज तुम्हाला शब्द देतो पुढे मी नागपुरात आल्याशिवाय राहणार नाही.. नागपुरात आल्यावर एक शिवसैनिकांचा मेळावा घेऊ… आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कमध्ये सभा घेतली होती, तेव्हा तिथली गर्दी ओसंडून वाहत होती.. अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की मैदान चुकलंय मात्र आम्ही जिथं उभं राहतो ते मैदान ओसांडून वाहतं, असंही उद्धव ठाकरे म्हाले.

आता तेवढा मोठा मैदान सरकारने नागपूरला शिल्लक ठेवला असेल, तर मी त्या मैदानात येणार आणि सभा घेणार आहोत. पाऊस सुरू होत आहे मला कल्पना आहे.  पुढच्या महिन्यात शिवसैनिकांचा प्रचंड मेळावा घेऊयात. मी त्या मेळाव्याला येतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

तुमच्या प्रेमामुळे शिवसेना आहे आणि शिवसेना राहील आणि जे जे शिवसेनेच्या मुळावर येतील त्यांना संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही, हा मला विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिमनांदेड हिंगोली, परभणी, धाराशिवशिर्डी या मतदारसंघात खासदार फुटीनंतर शिवसैनिक आणि मतदारांसोबत संवाद साधणार आहेत. 27 जून ते 29 जून या तीन दिवसांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंचा या मतदारसंघात दौरा असेल.

दरम्यान, आता पलटवार होणार, फितूरांच्या फितूरीला उत्तर देणार , निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार! असा ट्रेलर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.