केतन अन् सियाचं लग्नासाठी 17 कोटींचा खर्च नव्हता; ना विमानं बुक केली, जयपूरला नाही तर…; सियाच

पुणे/लोणावळा: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावरून सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विशेषतः केतन आणि आरोपी सिया यांच्या होऊ घातलेल्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी (Destination Wedding) कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि खाजगी विमाने बुक केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या सर्व अफवांवर आता सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी जाहीर खुलासा करत सत्य समोर आणले आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या विवाहासाठी राजस्थानमध्ये १७ कोटींचा पॅलेस बुक असून, दोन चार्टर्ड विमानं बूक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु यात अजिबात तथ्य नसून माझी जास्तीत जास्त ५ कोटींपर्यंत खर्च करण्याची ऐपत होती, असं सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी म्हटलं आहे.

केतन अग्रवाल मृत्यू: “कोणतीही खाजगी फ्लाइट बुक केलेली नव्हती!”

सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, “मीडियात चाललेल्या १४ ते १७ कोटी रुपयांच्या विमानांच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि चुकीच्या आहेत. लग्नासाठी कोणतेही खाजगी विमान (Private Jet) बुक करण्यात आले नव्हते. याबद्दल कधी कोणती चर्चाही झाली नव्हती. आम्ही आपापसात ठरवले होते की, जुलै महिन्यात दोन्ही कुटुंबे आपापली विमानाची तिकिटे स्वतः काढतील. पुण्यावरून आमच्या बाजूने साधारण ७० कपल्स (दांपत्य) जाणार होते. मी स्वतः पुण्यावरून अहमदाबाद आणि तिथून पुढे कारने हॉटेलपर्यंत जाण्याचे नियोजन पुढच्या महिन्यात करणार होतो. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.”

Ketan Agarwal Death : जयपूरला नाही, तर उदयपूरला होणार होते लग्न; खरा खर्च आला समोर!

लग्नाच्या ठिकाणाबाबत खुलासा करताना ते म्हणाले, “जयपूरमध्ये कोणतेही हॉटेल बुक करण्यात आले नव्हते, तर उदयपूरमधील ‘अनंता रिसॉर्ट’ (Ananta Resort) बुक करण्यात आले होते. तिथे एका कपलचा ३ दिवसांचा खर्च साधारण ८७,००० रुपये होता. आमच्या बाजूने ६० ते ६५ खोल्या (Rooms) आणि मुलीच्या बाजूने १५० ते १५५ खोल्या बुक केल्या होत्या. ३ दिवसांचे बजेट, कार्यक्रम, जेवण या सर्वांचा मिळून हॉटेलचा एकूण खर्च २.७५ कोटी ते ३ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता.”

ते पुढे म्हणाले, “मुलगा-मुलगी एकमेकांना भेटल्यानंतर दीड-दोन तास त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर एका छोट्या कार्यक्रमात लग्न ठरले. १५ ऑगस्टला येणारा सण आणि घरातील माता की चौकीचा कार्यक्रम, तसेच हॉटेलचा सर्व खर्च मिळून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण लग्नाचा एकूण खर्च साधारण ४ ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता. यापेक्षा मोठा कोणताही खर्च नव्हता.”

Ketan Agarwal Death : सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती

“तुम्ही काही दागिने दिले होते का किंवा त्यांनी तुम्हाला काही दिले होते का?” या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, “आम्ही त्यांना काही गोष्टी दिल्या होत्या. त्यांनी देखील सियाला जे काही दिले होते, ते आम्ही तातडीने त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. आमच्या घरात डिसेंबर महिन्यापासून नूतनीकरणाचे काम सुरू असून तिथे १० लोकांची टीम काम करत आहे. जर आम्ही पती-पत्नी बाहेर गेलो, तर मागे दागिन्यांची देखभाल कोण करणार? याच काळजीपोटी माझी पत्नी नेहमी त्यांना फोन करून सांगायची की, ‘दीदी, केतनकडे आम्ही हे दागिने परत देत आहोत, तुम्ही ते सांभाळा, आम्हाला ते इथे ठेवायचे नाहीत.’ त्यामुळे त्यांनी आजपर्यंत जे काही दिले होते, ते आम्ही त्यांना सुरक्षितपणे परत केले होते.”

Comments are closed.